लॉकडाऊन देशासाठी मोठा झटका ठरेल : राहुल गांधी

27 Mar 2020 18:36:14
Rahul Gandhi_1   
 
 


सोनिया गांधींनी केले लॉकडाऊनचे समर्थन

 
 
नवी दिल्ली : जगभरातून लॉकडाऊनचे आवाहन केले जात असताना राहुल गांधी यांनी ल़ॉक़डाऊन हे देशाचे कंबरडे मोडणारे ठरेल, असे मत व्यक्त केले आहे. देशातील गोरगरीब जनतेला याचा फटका बसू शकतो, अजूनही उशीर झालेला नाही, असेही ते म्हणाले आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केले होते. मात्र, खासदार राहुल गांधी यांच्या या नव्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
 
 
राहुल गांधी नेमकं काय म्हणाले ?
 
देशातील गरीब आणि कमजोर व्यक्तीला संपवून टाकेल. भारतासाठी हा मोठा धक्का असेल. भारत हा काळा किंवा गोरा नाही, आपल्याला निर्णयांवर आणखी लक्ष केंद्रीत करावे लागेल. या संकटाला तोंड देण्यासाठी आणखी सुक्ष्म आणि दयाळू दृष्टीकोनाची गरज आहे. अजूनही उशीर झालेला नाही.
 
 
सोनिया गांधींनी केले लॉकडाऊनचे समर्थन
 
 
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लॉकडाऊनचे समर्थन करत मोदी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले होते. मात्र, राहुल गांधींनी या निर्णयामुळे गोरगरिबांची उपासमार होत आहे, असे म्हटले आहे.
Powered By Sangraha 9.0