कोरोना संकटावर मात करण्यासाठी कलाकार मंडळी पुढे सरसावली!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Mar-2020
Total Views |

bollywood_1  H



कलाकारांकडून कोरोनाग्रस्तांसाठी मदतीचा हात


मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात वाढता कोरोना व्हायरसचा विळखा पाहता आता विविध स्तरामधून मदतीचा ओघ पुढे आला आहे. अनेक खासदार, आमदारांनी आपलं वेतन सहाय्यता निधीला दान केलं आहे. आरोग्य क्षेत्राला आणि वैद्यकीय मदतीसाठी कॉर्परेट क्षेत्र पुढे आले आहे, तर बॉलिवूडमधूनदेखील कलाकार मंडळी आता मदतीसाठी पुढे आले आहेत. बॉलिवूड कलाकार हृतिक रोशनयाने समाजिक भान जपत मुंबई महानगर पालिकेसाठी मदतीचा हात पुढे करत आर्थिक मदत जाहीर केली आहे. कॉमेडी किंग कपिल शर्मानेही पंतप्रधान रिलीफ फंडाला मदत जाहीर केली आहे. यासोबत कलाकार आणि खासदार सनी देओल देखील मदतीसाठी पुढे आले आहेत. सचिन तेंडुलकरनेही मदतीचा हात पुढे केला आहे.


महाराष्ट्रात सध्या कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. राज्यात कोरोना बाधित १३० च्या वर गेले आहेत. तर देशामध्येही ७००च्या जवळ कोरोनाबाधितांचा आकडा गेल्याने आता भारतामध्येही कोरोना व्हायरसचं संकट गडद होत असल्याचं चित्र आहे. त्यापार्श्वभूमीमुळे सरकारी यंत्रणेला तात्काळ मदत मिळावी यासाठी अनेक सामाजिक संघटना समोर आल्या आहेत.


कोरोना व्हायरस विरूद्धचं युद्ध जिंकायचं असेल तर पुढील काही काळ लॉकडाऊनमध्येच राहण्याचा कठीण नियम जगात सगळीकडेच नागरिकांना पाळावा लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवरही समाजात कोरोना व्हायरस बाबत जनजागृती वाढावी म्हणून काम केले जात आहे. कलाकारांनी नागरिकांना घरातच बसून राहण्याचे आवाहन केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@