'सिद्धिविनायक मंदिर न्यासा'तर्फे रक्त संकलन मोहिम

27 Mar 2020 12:17:12
siddhivinayak_1 &nbs
 
 

 
मुंबई : राज्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन सिद्धिविनायक मंदिर न्यासा तर्फे रक्तसंकलन मोहिम सुरू करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या वतीने रक्तदान करण्याचे आवाहन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
 
मुंबईत राहणाऱ्या ज्या नागरिकांना रक्तदान करण्याची इच्छा आहे, त्यांनी आपले नाव 'श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरा'त दूरध्वनीद्वारे सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ०२२-२४२२४४३८ आणि ०२२-२४२२३२०६ या क्रमांकावर संपर्क करून नाव नोंदणी करायची आहे.
 
 
रक्तदात्याच्या राहत्या घराच्या जवळ, थेट सोसायटीच्या आवारात 'श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासा'च्या वतीने महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाची रक्त संकलन व्हॅन पोहचेल. रक्तदात्याना राहात्या ठिकाणी रक्तदान करता येणार आहे.
Powered By Sangraha 9.0