विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना आता दोन हजारांचा दंड

26 Mar 2020 17:37:30

Noida Police_1  
 
 
नवी दिल्ली : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन केले असताना विनाकारण काही टवाळखोर दुचाकीस्वार बाहेर फिरत आहेत. त्यांना चाप लावण्यासाठी आता पोलीसांनी नवी शक्कल लढवली आहे. प्रत्येक दुचाकीस्वाराकडून आता दोन हजारांचा दंड आकारला जाणार आहे. दरम्यान, नोएडा पोलीसांनी ही कारवाई सुरू केली असून दोन हजारांचा दंड घेतला जात आहे.
 
 
जनता कर्फ्यूच्या दिवशी नागरिकांनी घरी बसणे पसंत केले होते मात्र, काहींनी मुद्दामहून दुचाकी बाहेर काढत बाहेर फेरफटका मारला. अशांवर पोलीसांनी ही दंडांत्मक कारवाई केली होती. ही कारवाई कोणत्या कलमाच्या आधारे केली याबद्दलची विस्तृत माहिती नाही. मात्र, पोलीसांना न जुमानत असलेल्या दुचाकीस्वारांना कायद्याचा दंडुका वेगवेगळ्या राज्यात बसत आहे.
मी समाजाचा शत्रु आहे मी बाहेर फिरणारच, अशा आशयाचा मजकूर लावून काही दुचाकीस्वार पंजाब आणि राजस्थानमध्ये फिरत आहेत. नोएडा पोलीसांत मात्र, अशा शंभर तक्रारी दाखल आहेत. पोलीसांनी कायदेशीर कारवाई करत बाहेर फिरणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
 
Powered By Sangraha 9.0