घरीच राहा : तुमच्या समस्या व्हॉट्सअॅपद्वारे सोडवणार

    दिनांक  26-Mar-2020 14:42:36
|

whatsapp_1  H x
 
 

मुंबई : भाजप युवा मोर्चा अध्यक्ष खासदार पूनम महाजन यांनी नागरिकांनी घरी थांबावे यासाठी एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. नागरिकांनी त्यांच्या समस्या व्हॉट्सअॅपवर मांडण्याचे आवाहन त्यांनी केले असून या सोडवण्यासाठी भाजप कार्यकर्ते पुढाकार घेणार आहेत.
 


 


प्रशासनातर्फे नागरिकांना घरी थांबण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, दैनंदिन कामे आणि गरजांसाठी नागरिक घराबाहेर पडत आहेत. त्यातच सार्वजनिक वाहनेही बंद असल्याने अनेकांची गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार पूनम महाजन यांनी व्हॉटसअॅपद्वारे नागरिकांची कुठलीही समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. विलेपार्ले, चांदिवली, वांद्रे, कलिना आणि कुर्ला या भागात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी खाली दिलेल्या विभागवार व्हॉट्सअॅप क्रमांकावर त्यांच्या समस्या नोंदवण्याचे आवाहन खा. पूनम महाजन यांनी केले आहे.
 
 
विलेपार्ले - 9322236483

चांदिवली - 9029190071

वांद्रे (पू) - 8169148865

वांद्रे (प) - 9821018936

कलिना - 9930770124

कुर्ला - 9892430968

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.