उद्यापासून करंजा बंदरावर मासे विक्रीला सुरुवात; कोरोनामुळे विशेष उपाययोजना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Mar-2020
Total Views |
fish port_1  H
 
 
 

मासे विक्री आणि वाहतुकीचा समावेश अत्यावश्यक सेवांमध्ये 

 
 
 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईतील प्रमुख बंदरे मत्स्यविक्रीसाठी बंद असताना उद्यापासून (२७ मार्च) करंजा बंदरावर मासे विक्रीला सुरुवात होणार आहे. केंद्र सरकारने नुकताच मासे विक्री आणि वाहतुकीचा समावेश अत्यावश्यक सेवांमध्ये केला आहे. या पार्श्वभूमीवर करंजा बंदरावर मासे खरेदी-विक्रीला सुरुवात होणार आहे. याठिकाणी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मच्छीमारांनी काही विशेष उपाययोजना आखल्या आहेत.
 
 
 
 
 
राज्यात लाॅकडाऊन जाहीर झाल्यापासून मत्स्यव्यवसाय बंद पडला आहे. अत्यंत तुरळक प्रमाणात माशांची खरेदी विक्री सुरू आहे. राज्यातील प्रमुख बंदरांपैकी असलेल्या ससून आणि भाऊचा धक्क्यावरील व्यवहार ठप्प पडला आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी परिपत्रक काढून मत्स्य विक्री आणि त्याच्या वाहतुकीचा समावेश अत्यावश्यक सेवेमध्ये केला आहे. आज महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विभागाने देखील यासंबंधी परिपत्रक काढून मत्स्य वाहतूक आणि विक्रीवर निर्बंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे उद्यापासून रायगड जिल्ह्यातील करंजा बंदरावरील व्यवहार पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. सकाळी सहा वाजल्यापासून माशांच्या विक्रीला सुरुवात होईल.
 
 
 
 

fish port_1  H  
 
 
 
केंद्र आणि राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार मत्स्य विक्री आणि वाहतुकीवर बंधन राहिलेली नाहीत. त्यांचा समावेश अत्यावश्यक सेवांमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही उद्यापासून करंजा बंदरावर माशांच्या विक्रीला सुरुवात करणार असल्याची माहिती 'आॅल इंडिया पर्ससीन वेलफेअर असोसिएशने'चे अध्यक्ष गणेश नाखवा यांनी दिली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ग्राहकांपासून सुरक्षित अंतर ठेवून विक्रीचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी बंदरावर ग्राहकांना उभे राहण्यासाठी आणि मच्छीमाराला बसण्यासाठी चौकोनी बाॅक्स तयार करण्यात आले आहेत. या बाॅक्स मध्ये उभे राहून खरेदी-विक्री करण्यात येईल.
 
 
@@AUTHORINFO_V1@@