बुलाया न था पर चले गये ! कोरोनाग्रस्तांच्या मदतीला धावले ‘हे’ शायर

26 Mar 2020 16:24:36

rahat indori_1  
मुंबई : कोरोनाने जगासह संपूर्ण देश त्रस्त आहे. कोरोनाच्या साथीमुळे देशभरामध्ये विविध संस्था, विविध लोक कोरोनाग्रस्तांच्या मदतीला समोर येत आहेत. अशामध्ये आता ‘बुलाती है मगर जाने का नहीं’ या व्हिडियोमुळे प्रसिद्धीस आलेले शायर राहत इंदौरी यांनीदेखील मदतीसाठी हात पुढे केला आहे. काही दिवसांपूर्वी शायर राहत इंदौरी यांचा ‘बुलाती है मगर जाने का नहीं’ हा शेर खूप चर्चेत आला होता. सोशल मीडियावर शेरने अक्षरशः धूमाकूळ घातला होता.
 
 
 
 
 
शायर राहत इंदौरी यांनी त्यांच्या स्वतःच घरात करोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करावे, असे पंतप्रधान मोदी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना सांगितले आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व शिवराज सिंह चौहानजी, परमेश्वराने देशामधील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढू देऊ नये. पण, जर वाढलीच आणि इंदौरमध्ये रुग्णांना विलगीकरणासाठी जागेची गरज असेल तर माझे घर तयार आहे. ईश्वर आपल्या सगळ्यांचे या संकटापासून रक्षण करो,’ असे राहत इंदौरी यांनी ट्विट केले आहे.
Powered By Sangraha 9.0