कोरोनाशी लढण्यासाठी पी. व्ही. सिंधूकडून १० लाखांची मदत

26 Mar 2020 17:04:00

pv sindhu_1  H



मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केली मदत

दिल्ली : जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या सुवर्णकन्या पी. व्ही. सिंधूने कोरोनाविरोधातील लढाईसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. पी. व्ही सिंधूने तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रत्येक ५-५ लाखांची मदत दिली आहे. पी. व्ही सिंधूने याबाबत ट्विट करत ही माहिती दिली आहे.

देशभरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. कोरोनाविरोधातील लढाईसाठी सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. या लढाईमध्ये अनेक खेळाडूंनी आपापल्या पध्दतीने मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी बजरंग पुनिया, गौतम गंभीर या खेळाडूंनी मदतीचा हात पुढे करत आपला पगार सहाय्यता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला होता. तर, सौरव गांगुलीने गरजू लोकांना तांदूळ वाटण्याचा निर्णय घेतला आहे. या लढाईमध्ये आता पी. व्ही सिंधूने उडी मारत तिने १० लाखांची मदत केली आहे.




दरम्यान, कोरोना विषाणूने जगभरामध्ये कहर केला आहे. या विषाणूने आतापर्यंत २१ हजार नागरिकांचा बळी घेतला आहे. भारतात सुद्धा या विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशामध्ये ६४९ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर आतापर्यंत १३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. लॉकडाऊनच्या काळात फक्त जीवनावश्यक सेवा सुरु राहणार असल्याचे सरकारने सांगितले आहे.
Powered By Sangraha 9.0