मायकल जॅक्सनला आधीच माहिती होते कोरोनाचे संकट ?

26 Mar 2020 18:49:51
Michel Jacson_1 &nbs
 
 
 

 सुरक्षारक्षकाचा दावा !

प्रसिद्ध पॉप सिंगर आणि ब्रेक डान्सर मायकल जॅक्सन याला कोरोना सारख्या महामारीची आधीच माहिती होती, असा दावा त्याच्या सुरक्षारक्षकाने दिली आहे. त्याला अशाप्रकारे महामारी एक दिवस सर्वांचा जीव घेईल याची जाणीव फार पूर्वीच झाली होती, अशी माहिती त्याच्या माजी सुरक्षारक्षकाने दिली आहे. याच कारणास्तव मायकल जॅक्सन वारंवार चेहऱ्यावर मास्क लावत होता. मात्र, सर्वजण त्याची खिल्ली उडवायचे परंतू तरीही त्याने मास्क परिधान करण्याची सवय सोडली नव्हती.
 
 
'आयएएनएस' वृत्त संस्थेच्या 'द सन डॉट कॉम'च्या हवाल्यानुसार मायकल जॅक्सनचा सुरक्षारक्षक मॅट फिड्स याने हा दावा केला आहे. मॅट कित्येक वर्षे मायकल जॅक्सनचा कर्मचारी होता. कोरोनासारखा आजार एक दिवस जग संपवेल, अशी भिती त्यांनी व्यक्च केली होती. अशाप्रकारचा एखादा विषाणू जगातील महामारी बनू शकतो, याबद्दल भाकित जॅक्सनने केले होते. त्यामुळे आपल्या आरोग्याबद्दल एकदम जागरुक असायचा. त्याने हा सुद्धा दावा केला होता कि, हा विषाणू एखाद्या विमानाद्वारे काही देशांमध्येही वाऱ्यासारखा पसरेल.
 
 
मायलक जॅक्सन वारंवार मास्क परिधान करत असे. त्याच्या या सवयीमुळे त्याची टींगलही केली जायची मात्र, तरीही तो स्वतःची काळजी घेत असे असा खुलासा त्याच्या मॅट यांने केला आहे. मास्क घालू नको, असे कुणी सांगितले तर जॅक्सन सांगायचा, 'अशामुळे मी आजारी पडेन, माझा मृत्यू अशा कुठल्या आजाराने झाला तर माझ्या फॅन्सना ते रुचणार नाही. मला आणखी चार क़ॉन्सर्टची तयारी करायची आहे. विषाणू काहीही करू शकतो, माझ्या आवाजावरही परिणाम होऊ शकतो. मला निरोगी राहण्याची आवश्यकता आहे. मी कुणाला भेटेने त्याच्यापासून मला संसर्ग होईल', असा जॅक्सन सांगायचा. मॅटने ही माहिती दिली आहे. 'ते आज जीवंत असते तर ही महामारी पाहून त्यांनी स्वतःचे भाकीत खरे ठरल्याचाही दावा केला असता.', असेही मॅट म्हणाला.
 
Powered By Sangraha 9.0