खुशखबर ! ‘फ्लिपकार्ट’ची ऑनलाइन सेवा पुन्हा सुरु

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Mar-2020
Total Views |

flipkart_1  H x
मुंबई : कोरना विषाणूच्या प्रादुर्भावाने सगळीकडे हाहाकार माजला. यामुळे जीवनावश्यक सर्व सेवा नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी सरकारने अनेक प्रयत्न केले आहेत. कोरोनामुळे देशामध्ये २१ दिवसाचा लॉकडाऊन जारी केल्यानंतर आता फ्लिपकार्टने सर्वांना आनंदाची बातमी दिली आहे. आता फ्लिपकार्ट कंपनी जीवनावश्यक गोष्टींची होम डिलिवरी करणार आहे. विशेष म्हणजे, लॉकडाऊन जारी केल्यानंतर फ्लिपकार्टने सर्व सेवा बंद करत असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर कंपनीने आपला निर्णय बदलला आहे.
 
 
केंद्र आणि राज्य सरकारकडून सुरक्षेबाबत हमी मिळाल्यामुळे कंपनीने आपल्या किराणा सामान व जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा पुरवण्याच्या सेवा पुन्हा सुरू करत असल्याचे कंपनीने सांगितले आहे. तर, अॅ्मेझॉनकडून अद्याप सरकारसोबत याबाबत चर्चा सुरू सुरू असल्याची माहिती आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून आम्हाला सामानाच्या होम डिलिव्हरीदरम्यान सुरक्षेबाबत आश्वसान देण्यात आले आहे. त्यामुळे अशा कठीण प्रसंगी ग्राहकांच्या सोयीसाठी, त्यांना जास्त समस्यांचा सामना करावा लागू नये यासाठी आम्ही आवश्यक सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. अशी माहिती फ्लिपकार्ट समूहाचे सीईओ कल्याण कृष्णमूर्ती यांनी याबाबत माहिती दिली.
 
 
@@AUTHORINFO_V1@@