लॉकडाऊन काळात दूरदर्शनवर पुन्हा दिसणार रामायण-महाभारत!

26 Mar 2020 17:49:38

ramayan mahabharta_1 



प्रसार भारतीच्या शशी शेखर यांनी ट्विट करत दिले संकेत!

मुंबई : कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशभरात लॉकडाउनचा आदेश जाहीर करण्यात आला आहे. यामुळे घरी असलेली लोक विविध प्रकारे त्यांचा वेळ घालवत आहेत. तसेच कोरोना व्हायरसमुळे शुटिंग सुद्धा रद्द करण्यात असल्याने कोणतेही नवे चित्रपट किंवा मालिका सुद्धा प्रसारित केल्या जात नाहीत. याचा फटका सिनेसृष्टीला होणारच आहे. टिव्ही चॅनल्सवर सध्या रिपिट टेलिकास्ट दाखवले जात आहेत. मात्र घरी बसून कंटाळलेल्या प्रेक्षकांसाठी दुरदर्शन त्यांच्या आठवणीतले दोन कार्यक्रम लवकरच प्रसारित करणार आहे. दुरदर्शन रामायण-महाभारत पुन्हा प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे. रामायण आणि महाभारत हे दुरदर्शनवरील प्रसिद्ध आणि लोकप्रिय टिव्हीशोपैकी एक आहे. या कार्यक्रमांनी प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात घर केले असून या मधील कलाकार सुद्धा प्रत्येकाच्या आठवणीत राहिले आहेत.





प्रसार भारतीचे शशि शेखर यांनी ट्वीट करत एका युजर्सला प्रश्नाचे उत्तर दिले आहे. त्यावेळी शेखर यांनी असे म्हटले आहे की, रामायण-महाभारत कोणत्या वेळेत प्रसारित केले जाईल याची वेळ लवकरच जाहीर केली जाणार आहे. रामानंद सागर निर्मित रामायण १९८७मध्ये चित्रित करण्यात आले होते. तसेच बी. आर, चोपडा निर्मित महाभारताचे चित्रीकरण १९८८मध्ये करण्यात आले होते.
Powered By Sangraha 9.0