आणि मुख्यमंत्री पोलीसांना म्हणतात, थोडं सबुरीनं घ्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Mar-2020
Total Views |
Vasai-Police_1  
 


वसईत पोलीसाच्या अंगावर घातली गाडी


वसई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात 'लॉकडाऊन' असतानाही काही टवाळखोर लोकांमुळे पोलीसांच्या जीवावर बेतण्याची वेळ आता आली आहे. वसईत अशाच एका टवाळखोराच्या मस्तीमुळे पोलीसाला गंभीर दुखापत झाली आहे. बंदोबस्तावर असलेल्या पोलीस उपनिरिक्षक सुनील पाटील यांच्या अंगावर एकाने दुचाकी घातल्याने त्यांच्या हाताला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. वसईतील आयसीएस रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती गंभीर आहे.
 
 
सुनील पाटील हे वसईत बंदोबस्तावर होते. सकाळपासूनच ते नागरिकांना घरी थांबण्याचे आवाहन करत होते. गेल्या काही दिवसांपासून राज्य भरातील पोलीसांनी बाहेर फिरणाऱ्यांना आपल्या खाक्या दाखवला होता. वाकनपाडा येथे काही टवाळखोर रस्त्यावर दुचाकी घेऊन थरार करत होते. पाटील यांनी त्यापैकी एका दुचाकीसमोर जाऊन तरुणांना हटकले. मात्र, त्यांना न जुमानता गाडी त्यांच्या अंगावर घातली. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
 
 
जनतेची सेवा करणाऱ्यांचे असे हाल का, असा सवाल आता या घटनेनंतर परिसरात विचारला जात आहे. कोरोना सारख्या गंभीर महामारीशी लढण्यासाठी लोकांना घरी थांबवण्याचे आवाहन सरकार आणि प्रशासन करत आहे. मात्र, तरीही असे प्रकार घडत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीसांनी दंडुक्याचा वापर कमी करावा, असे आवाहन केले होते. मात्र, पोलीसांच्या जीवावर बेतण्यासारखे प्रकार होत असतील तर गप्प बसायचे का ?, असा सवाल आता विचारला जात आहे.
@@AUTHORINFO_V1@@