देशातील ८० कोटी नागरिकांना रास्त दरात धान्य उपलब्ध करून देण्याच केंद्राचा निर्णय

    दिनांक  25-Mar-2020 20:13:45
|


cabinet_1  H xनवी दिल्ली : करोना महासाथीचा सामना करण्यासाठी देशात २१ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशातील ८० कोटी नागरिकांना पुढील तीन महिन्यांसाठी दरात गहु आणि तांदुळ अनुक्रमे २ आणि ३ किलोग्रॅम या दराने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकारपरिषदेत बुधवारी दिली.

 

८० कोटी नागरिकांना ७ किलो धान्य रास्त दरात देणार

 

देशातील आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता गरिबांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागू नये, यासाठी केंद्र सरकारने देशातील ८० कोटी नागरिकांना रास्त दरात रेशनपुरवठा केला जाणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, ८० कोटी नागरिकांना दरमहा सात किलो धान्य पुरविण्यात येणार आहे. त्यामध्ये २७ रूपये प्रतीकिलो दराचा गहु २ रूपये किलो, तर ३७ रूपये प्रतीकिलो दराचा तांदुळ ३ रूपये प्रतीकिलो या दराने पुरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे हे सर्व राज्यांना तीन महिन्यांचे आगावू देण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारतर्फे १ लाख ८० हजार कोटी रूपये खर्च करण्यात येत आहेत. यामुळे राज्यांकडे अन्नधान्याचा पुरेसा साठा उपलब्ध असेल, असे जावडेकर म्हणाले.

 

करोना महासाथीचा सामना करण्यासाठी देशात २१ दिवसांसाठी म्हणजे १५ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. मात्र, देशात जीवनावश्यक वस्तूंचा म्हणजे अन्न-धान्य, दुध, औषधे आदींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, त्यामुळे नागरिकांना साठेबाजी करून नये असे आवाहन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले. त्याचप्रमाणे केंद्र व राज्य सरकार परस्पर समन्वयाने काम करीत असून नागरिकदेखील प्रशासनास सहकार्य करीत असल्याचे जावडेकर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अफवांर विश्वास न ठेवण्याचेही आवाहन त्यांना केले.

 

महाभारतात श्रीकृष्ण सारथी, आज १३० कोटी सारथी- पंतप्रधान

 

महाभारताचे युद्ध १८ दिवसात जिंकले होते, आता करोनाविरोधातील युद्ध आपल्याला २१ दिवसात विजय मिळवायचा आहे. महाभारतात अर्जुनाचे सारथ्य श्रीकृष्णाने केले होते, मात्र आज १३० कोटी जनतारूपी सारथ्यांच्या भरवशावर करोनाविरोधात लढा जिंकायचा आहे. त्यामुळे पुढील २१ दिवस लॉकडाऊनचे कसोशीने पालन करायचे आहे. त्याचप्रमाणे करोना महासाथीच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी अविरत कष्ट करीत आहेत. ते साक्षात देवाचे रूप असून आपला स्वार्थ सोडून देशसेवा आणि रुग्णसेवा करीत आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारचा भेदभाव करणे योग्य नाही. त्यांचा सन्मान हा झालाच पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी केले. वाराणसी या आपल्या मतदारसंघातील नागरिकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना ते बोलत होते.

 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.