श्रद्धा कपूरने अस्सल मराठीत दिल्या ‘हिंदू नववर्षा’च्या शुभेच्छा!

    दिनांक  25-Mar-2020 16:36:18
|
shradhha kapoor_1 &n

खास फोटो शेअर करत चाहत्यांना दिल्या ‘गुढी पाडव्या’च्या शुभेच्छा!मुंबई : आज गुढी पाडवा! मराठी नववर्षाची सुरुवात मानला जाणारा हा सण दरवर्षी शोभायात्रा, मेजवान्या, ढोल ताशांचे गजर आणि एकूणच उत्साहपूर्ण वातावरणात पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो, मात्र यंदा या सणावर कोरोनारूपी संकटाचे सावट असल्याने हा उत्साह काहीसा मावळला आहे. लोकांना घराबाहेरही पडणे शक्य नसल्याने यंदा शोभायात्रा सुद्धा रद्द करण्यात आल्या आहेत, परिणामी या सणाचे घरगुती सेलिब्रेशन केले जात आहे. या सेलिब्रेशनचे फोटो सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. यापैकी एक खास फोटो बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने शेअर केला आहे. श्रद्धाने अस्सल मराठीत आपल्या चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी तिने आपली आई, आजी आणि स्वतःचा फोटो शेअर करून आपल्या तीन पिढ्यांमधून जपलेली मराठमोळी संस्कृती दाखवून दिली आहे.

श्रद्धा कपूरने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोला मराठीतून कॅप्शन देताना, ‘पिढ्यानपिढ्या जपलेला पेहराव...साडीपिढ्यानपिढ्या उभारलेला सन्मान...गुढी पिढ्यानपिढ्या चालत आलेला वारसा...गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.’ असे म्हंटले आहे. श्रद्धाने या कॅप्शन सोबत आई आणि आजीचा जुना फोटो तसेच, स्वतःचा सुद्धा साडीतील एक सुंदर फोटो शेअर केला आहे.आई आणि मावशी मराठी असल्याने श्रद्धाला अतिशय उत्तम मराठी बोलता व लिहिता येते.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.