जी २० परिषद : पंतप्रधान मोदींचे कोरोनाला वैश्विक लढा घोषित करण्याचे आवाहन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Mar-2020
Total Views |


modi _1  H x W:



नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी जी २० शिखर परिषदेत कोरोना विषाणूविरूद्धच्या लढ्याला जागतिक लढ्यात रूपांतर करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जिथे सहभागी देश त्यांच्या वैद्यकीय ज्ञान आणि संसाधनांच्या मदतीने या व्हायरसचा प्रसार रोखण्यास मदत करू शकतात. यापरिषदेशी संबंधित लोकांनी याबाबत माहिती दिली आहे.


या परिषदेत सहभागी देश त्यांच्याजवळील वैद्यकीय ज्ञान आणि संसाधनांच्या मदतीने व्हायरसचा फैलाव रोखू शकतील. जी -२० बैठकीचे उद्दीष्ट सदस्य देशांनी सर्वाधिक फैलाव झालेल्या देशांना व गरीब सदस्य देशांना वैद्यकीय क्षमता वाढविणे आणि व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी व त्यावर उपचार करण्यासाठी वैज्ञानिक प्रयत्न करणे हा आहे.


जी -२० व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी राहणार उपस्थिती


सौदी अरेबियाचा सुलतान सलमान बिन अब्दुल अजीज अल सौद जी २० आपत्कालीन शिखर परिषदेच्या अध्यक्षस्थानी असेल. गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही परिषद होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह जगातील इतर शीर्षनेते यात सहभागी होतील. 
सध्या जी २०चे अध्यक्ष असलेल्या सौदी अरेबियाने गेल्या आठवड्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जी २० शिखर परिषद घेण्याची मागणी केली. या जागतिक संकटाला तोंड देण्यासाठी वेगवान पावले न उचलल्याबद्दल प्रबळ अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांवर टीका केली. बुधवारी जाहीर केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, जी -२० अध्यक्ष सौदी अरेबिया यांनी २६ मार्च गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक बोलावली आहे. या बैठकीचे अध्यक्ष सुलतान सलमान बिन अब्दुल अजीज अल सऊद असतील. या बैठकीत कोरोना साथीचा रोग आणि त्याच्या मानवी आणि आर्थिक परिणामाशी संबंधित समन्वयित उपायांवर विचार केला जाईल.



जी -
20 मध्ये इटली, स्पेन, जॉर्डन, सिंगापूर आणि स्वित्झर्लंडसारख्या कोरोना विषाणूमुळे ग्रस्त देशांचे प्रतिनिधी सहभागी होतील. युनायटेड नेशन्स, वर्ल्ड बँक, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि आर्थिक सहकार व विकास संस्था यासारख्या प्रमुख आंतरराष्ट्रीय संस्था यात सहभागी होतील. या बैठकीत आसियान (आग्नेय आशियाई देशांचे संघटन), आफ्रिकन युनियन, आखाती सहकार परिषद आणि आफ्रिकेच्या विकासातील नवीन भागीदारी (नेपॅड) सारख्या प्रादेशिक संघटनांचे प्रतिनिधीही सामील असतील.



जी -
20 मध्ये भारताव्यतिरिक्त अर्जेटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, जर्मनी, फ्रान्स, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, तुर्की, ब्रिटन आणि अमेरिका यांचा समावेश आहे. त्यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीनही सामील होतील.

@@AUTHORINFO_V1@@