राज्यातील माशांच्या वाहतुकीचा समावेश अत्यावश्यक सेवांमध्ये; केंद्राचा आदेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Mar-2020
Total Views |
fishing_1  H x


मत्य बीज आणि मत्स्य खाद्याच्या वाहतुकीवर निर्बंध नाहीत

 
 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - केंद्र सरकारच्या मत्स्यपालन विभागाने मासे, मत्स्य बीज आणि मत्स्य खाद्याचा समावेश अत्यावश्यक सेवेमध्ये केला आहे. महत्त्वाचे म्हणजे या गोष्टींची वाहतूक सुरळीतपणे सुरू करण्याचे आदेश बुधवारी परिपत्रकाव्दारे राज्य सरकारला देण्यात आले. लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मत्स आणि त्यासंबंधी गोष्टींच्या वाहतूकीवर रोख लावल्याच्या तक्रारी प्राप्त होताच केंद्राने हे पाऊल उचलले आहे.
 
 
 
 
कोरोनामुळे राज्यातील मत्स्यव्यवसाय डबघाईला आला आहे. मासेमारी पूर्णपणे ठप्प होण्याचा मार्गावर पोहोचली आहे. मंगळवारी देशभरात लाॅकडाऊनची परिस्थिती जाहीर होताच अनेक राज्यांमध्ये माशांची वाहतूक थांबविण्यात आली. माशांबरोबर कृत्रिम मत्स्यपालनासाठी आवश्यक असणारी मत्स्य बीज आणि मत्स्य खाद्याची वाहतूकीवरही रोख लावण्यात आले. याबाबतच्या तक्रारी प्राप्त होताच केंद्र सरकारने बुधवारी महत्वपूर्ण परिपत्रक काढून यासंदर्भात खुलासा केला. केंद्रीय मत्स्यपालन विभागाचे सचिव सागर मेहरा यांनी प्रसिद्द केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, राज्यांमध्ये मासे, मत्स्य बीज आणि मत्स्य खाद्याच्या वाहतुकीवर रोख लावण्यात आलीआहे. असे केल्यास मासेमार आणि उत्पादकांना आर्थिक फटका बसेल. त्यामुळे मत्स्यउत्पादन गोष्टींचा समावेश आम्ही अत्यावश्यक सेवेमध्ये करत आहोत.
 
 

fishing_1  H x  
 
 
कृत्रिम मत्स्य आणि कोलंबी पालनासाठी मत्स्य बीज आणि मत्स्यखादय आवश्यक असते. अशा परिस्थितीत त्यांची वाहतूक बंद झाल्यास मत्स्यव्यवसायामध्ये आर्थिक उलथापालथ होईल आणि उत्पादक व मच्छीमारांच्या पोटावर पाय येईल. त्यामुळे लाॅकडाऊनच्या परिस्थितीत मासे, कोलंबीच्या वाहतुकीबरोबरच मत्स्य बीज आणि मत्स्य खाद्य या गोष्टी अत्यावश्यक सेवांमध्ये आणून त्यांची वाहतूक सुरळीत करण्याचे आदेश मेहरा यांनी राज्य सरकरांना दिले आहेत. महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विभागानेही केंद्राचे परिपत्रक प्राप्त झाल्यावर खुलासा केला आहे. राज्याअंतर्गत किंवा त्याबाहेर होणाऱ्या माशांच्या वाहतूकीवर किंवा मासेमारीवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाचे उपायुक्त राजेंद्र जाधव यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. मत्स्यव्यवसाय विभागाने मासेमारी किंवा त्याच्या वाहतूकीवर कोणत्याही प्रकारचे बंधन न लावल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका मासेमारीला बसला आहे. मासेमारी रोडावल्याने त्याच्या परिणाम थेट परदेशात निर्यातीवर पडला आहे. राज्यातून परदेशात होणारी माशांची निर्यात घटली असून गेल्या पंधरा दिवसांमध्ये यामुळे साधारण २०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
@@AUTHORINFO_V1@@