रुग्णांना सेवा नाकारणे डॉक्टर, रुग्णालयांना पडणार महाग

25 Mar 2020 17:20:13

rajendra yadravkar_1 
मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका निभावत आहेत ते डॉक्टर. अशामध्ये जगभरातील अनेक डॉक्टर आणि रुग्णालयांनी कोरोना आणि संबधित उपाययोजनांसाठी खुली ठेवली आहेत. अशामध्ये महाराष्ट्रात खासगी डॉक्टरच्या ओपीडी अथवा रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना सेवा देण्यास नकार देत आहेत. अशा रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिला आहे. आरोग्यमंत्र्यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी करून ही माहिती दिली.
 
 
 
 
 
 
राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी जारी केलेल्या पत्रकामध्ये आवाहन केले आहे की, “कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. शासकीय आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी या संकटाला सामोऱ्या जात आहेत. या परिस्थितीत खासगी क्षेत्रातील अनेक डॉक्टर्स आणि रुग्णालय सरकारला मदत करीत आहेत. मात्र, काही डॉक्टर्स व खासगी रुग्णालये त्यांच्या ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी शासनाकडे येत आहेत. खरतर आरोग्याच्या दृष्टीने ही मोठी आणीबाणी भारत देशावर आलेली आहे. अशा काळात सर्व घटक देशसेवा म्हणून आपापल्या परीने काम करीत आहेत, पण देशासमोरील या संकटाला सामोरे जात असताना आरोग्य क्षेत्रातील काही मोजकी मंडळी रुग्णसेवा नाकारत असल्याच्या तक्रारी येत आहेत, या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच डॉक्टर्स आणि रूग्णालयाच्या विश्वस्तांनी आपल्या रुग्णालयात येणाऱ्या सर्व प्रकारच्या रुग्णांना आपण आपल्या परीने सेवा द्यावी, असे आवाहन राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0