धार्मिक मेळाव्यामुळे पाकिस्तानात कोरोनाचा प्रसार

    दिनांक  25-Mar-2020 12:08:17
|
pakistan _1  H

 

 तबलीघी जमातीचा धार्मिक मेळावा ठरला कारक
 

 
मुंबई(प्रतिनिधी) - पाकिस्तानमध्ये नुकत्याच पार पडलेला इस्लामिक धार्मिक मेळावा या देशात कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचा कारक ठरला आहे. या मेळाव्यामुळे कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला असून पंतप्रधान इम्रान खान यांंनी सार्क आणीबाणीच्या निधीतून कोरोना व्हायरसच्या उपाययोजनांसाठी रक्कम मागणार किंवा देणार नाही आहेत.
 
 
 
 
दक्षिण आशियामधील पाकिस्तान हा दुसरा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या पूर्व भागात तबलीघी जमातीचा धार्मिक मेळावा पार पडला. या मेळाव्याला जगातील ८० देशांमधील हजारो मुस्लिम प्रचारक उपस्थित होते. शिवाय शेकडो पाकिस्तानी नागरिकही उपस्थित होते. कोरोना व्हायरसच्या वाढत्या फैलावामुळे १२ मार्च रोजी हा मेळावा संपवण्यात आला. मात्र, या मेळाव्यानंतर सहभागी झालेल्या पॅलेस्टाईन आणि किर्गिस्तानमधील नागरिकांची कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात हा मेळावा आग्नेय आशियामधील मलेशिया क्वालालंपूरमध्ये पार पडला होता. या मेळाव्यामुळे आग्नेय आशियामध्ये कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाल्याचे मलेशियन मिडीयाने सांगितले होते. तसेच न्यूयाॅर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या मेळाव्यात उपस्थित असलेल्या प्रचारकांनी ब्रुनेई आणि थायलंडमधून या विषाणूचा प्रसार आग्नेय आशियाई देशांमध्ये केला.
 
 
 
दरम्यान पाकिस्तानमध्ये कोरोना व्हायसरचा प्रादुर्भाव वाढला आहे. असे असतानाही पंतप्रधान इम्रान खान या व्हायरसच्या बचावासाठी काही हालचाल करताना दिसत नाही आहेत. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सार्क आणीबाणी निधीसाठी भारताने १०० दशलक्ष डॉलर्सची मदत केली आहे. मात्र, यामध्ये अंतर्गत पाकिस्तानने अद्याप कोणतीही मदत मागितली किंवा स्वीकारलेली नाही. भारताव्यतिरिक्त श्रीलंका (५ दशलक्ष डॉलर्स), बांगलादेश (१.५ दशलक्ष), नेपाळ ( १ दशलक्ष), अफगाणिस्तान (१ मिलियन डॉलर), मालदीव ($ २००,००० ) आणि भूतान (१०,००,०००) यांनी देणगी दिली आहे.
.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.