कोरोनामुळे शेअर बाजार गडगडला जेष्ठ नागरिकांनी म्युच्युअल फंडाची एसडब्लूपी चालू ठेवावी का ?

    दिनांक  25-Mar-2020 17:14:15
|

Mutual Fund Swp_1 &n

 
 


साधारण गेल्या - वर्षांपासून, जेंव्हा बँकांचे व्याज दर घसरणीला लागल्यापासून , बऱ्याचशा जेष्ठ नागरिकांनी आपली सेवानिवृत्ती नंतरची मोठी रक्कम म्युच्युअल फंडाच्या इक्विटी हायब्रीड फंडात गुंतवण्यास सुरवात केली. ह्या कॅटेगरीचे त्या वेळचे आकर्षण म्हणजे दर महिन्याला नियमित दिला जाणारा करमुक्त लाभांश. काही म्युच्युअल फंड - वार्षिक दराने तर काही म्युच्युअल फंड तब्बल १२ टक्के वार्षिक दराने दरमहा नियमित लाभांश देत राहिले. नोव्हेंबर २०१६ च्या नोटा निश्चलीकरणानंतर इक्विटी हायब्रीड ह्या कॅटेगरीचा गुंतवणूक ओघ जास्त वाढला. २०१८ च्या बजेट मध्ये ह्या लाभांशावर कर लागू झाला, म्हणजेच म्युच्युअल फंड ला लाभांश वितरणाच्या अगोदर सरकारला लाभांश कर वितरित करून मग गुंतवणूकदारांसाठी करमुक्त लाभांश वितरित करने चालू झाले. एप्रिल २०१८ पूर्वी लोकप्रिय असलेला लाभांश पर्याय गुंतवणूकदारांनी बदलून ग्रोथ पर्यायातील सिस्टिमॅटिक विथड्रॉव्हल प्लॅन (एस डब्लूपी) ची सुविधा घेण्यास सुरुवात केली.

 

एसडब्लूपीच्या सुविधेमध्ये म्युच्युअल फंडाचे वितरक आपल्या गुंतवणूकदारांना त्यांचा गुंतवणुकीवर वार्षिक साधारण - टक्के दराने एस डब्लू पी सुविधेद्वारे मासिक उत्पन्न मिळवून देऊ लागले. उद्दिष्ट एकच होते कि इक्विटी हायब्रीड कॅटेगरी मध्ये समभाग गुंतवणूक ही साधारण ६५ टक्के आणि कर्जरोखे गुंतवणूक ३५ टक्के आसपास असल्याने बाजारातून जर १०-११ टक्क्यांचा वार्षिक परतावा गृहीत धरल्यास गुंतवणूकदाराला नियमित उत्पन्नही मिळेल एसडब्लूपी परताव्यापेक्षा जास्तीची वाढ आपल्या मूळ गुंतवणुकीत वाढत जाईल. २०१८-१९ पासून जे गुंतवणूकदार एस डब्लू पी मधून नियमित उत्पन्न घेत आलेले आहेत, त्यांना अगदी जानेवारी २०२० पर्यंत नियमित उत्पन्न तसेच आपल्या मूळ गुंतवणुकीत काही घट झालेली दिसली नाही. म्हणजेच सर्व कसे अपेक्षेप्रमाणे सुरळीत सुरु होते. फेब्रुवारी २०२० मध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जगभर वाढत गेला आणि ताबडतोब अगदी पुढच्या २० दिवसात जगभरातले शेअर बाजार तब्बल ४० टक्क्यांनी आपटले. इक्विटी हायब्रीड फंडामध्ये समभागांचे प्रमाण ६५ टक्के असल्याने ह्या कॅटेगरी मधील फंड साधारण २८-३० टक्के खाली आले. म्हणजेच ज्यांची मूळ गुंतवणूक समझा रु १०,००,००० असेल तर ती २० दिवसात -.२५ लाखापर्यंत खाली आली.

 

अशावेळी एसडब्लूपीद्वारे दरमहा नियमित उत्पन्न घेणाऱ्या जेष्ठ नागरिक गुंतवणूकदारांनी काय करावे?

 

बाजारातील अल्पकालीन चढ उतार ही बऱ्याच अंशी भावनिक असते. कोरोना च्या भीतीने जागतिक शेअर बाजार खाली आले. मात्र आपण घाबरून जाता आपली गुंतवणूक कायम ठेवली पाहिजे. अन्यथा आपण आपले मोठे नुकसान करून घेऊ. चीनमध्ये जसा कोरोना नियंत्रणात आणला गेला तसा जागतिक पातळीवरही आटोक्यात आणला जाईल. मात्र त्याला काही कालावधी जाईल. वैद्यकीय विज्ञान आज खूप पुढे गेलेले आहे. ते नक्कीच काही औषधोपचार शोधून काढतील हा विश्वास आपण बाळगला पाहिजे. जेष्ठ नागरिकांचे गुंतवणुकीतून उद्दिष्ट काय आहे, तर आपल्याला दरमहा नियमित उत्पन्न मिळत राहिले पाहिजे. आपण आपल्या उद्दिष्टापासून अजिबात ढळता आपली एस डब्लू पी नियमित चालू ठेवली पाहिजे. कोसळलेल्या शेअर बाजारामुळे आपल्या गुंतवणुकीतील घट पाहून आपल्याला चिंता किंवा भीती निर्माण होणे स्वाभाविक आहे, मात्र आपली हि भीती किंवा चिंता दूर करून म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतला आपला विश्वास वृद्धिंगत व्हावा यासाठी काही माहिती देतो.

 

समझा आपण ०१/०४/२००८ ह्या दिवशी गुंतवणूक केली होती कारण हा असा काळ होता कि बाजार वरच्या दिशेनेच चालला होता. मी हि तारीख ह्या साठी घेतली कि ह्या तारखेनंतर सलग मार्च २००९ पर्यंत बाजार खाली खाली जात राहिला. मार्च २००९ मध्ये तो एप्रिल २००८ च्या उच्चान्क पेक्षा ६१ टक्क्यांच्या खालच्या पातळीवर बंद झाला होता. त्यानंतर पुढील एक वर्षात बाजाराने आपली २००८ ची उच्चान्कची पातळी पुन्हा पार केली होती. जर एखाद्या जेष्ठ नागरिक गुंतवणूकदाराने ०१/०४/२००८ ह्या तारखेला गुंतवणूक करून वार्षिक टक्के दराने दरमहा नियमित उत्पन्न घेतले असते तर त्याची आजची गुतंवणुकीची वाढ किंवा घट किती असती हे आपण दोन योजनांच्या प्रत्यक्ष एन. . व्ही. ( निव्वळ मालमत्ता मूल्य ) ने तपासून घेऊ.

 

१ ) पहिली योजना ICICI Prudential Balanced Advantage Fund. ०१/०४/२००८ ह्या दिवशी ह्या योजनेमध्ये आपण रु. १०,००,००० गुंतवून पुढील मे २००८ महिन्याच्या १० तारखे पासून आपली रु. ,५०० एसडब्लूपी चालू केली होती असती, तर साधारण मार्च २००९ मध्ये बाजार ६१ टक्के खाली आल्यावर आपल्या मूळ गुंतवणुकीचे मूल्य फक्त रु. ,६९,१०० उरले होते. अशा वेळी खचून जाता ज्यांनी आपली गुंतवणूक चालू ठेवली त्याच बरोबर आपली रु. ,५०० ची एस डब्लू पी चालू ठेवली त्यांच्या गुंतवणुकीत वाढ होऊन जानेवारी २०१० मध्ये मूळ गुंतवणुकीचे मूल्य पुन्हा रु. १० लाखापेक्षा जास्त झाले. मार्च २००९ मध्ये जे घाबरून बाहेर पडले त्यांचे खूप नुकसान झाले. असे गुंतवणूकदार पुन्हा म्युच्युअल फंडाकडे वळलेच नाहीत. ज्यांनी धैर्य दाखवले त्यांची मूळ गुंतवणूक हि २०२० च्या मार्च महिन्यातील शेअर बाजारातील ४० टक्के पडझडीनंतरही दि.२३/०३/२०२० रोजी मूल्य रु. १२,६१,५०९ आहे . त्याच बरोबर गेल्या १४३ महिन्यात मासिक रु. ,५०० प्रमाणे एकंदर रु. १०,७२,५०० इतके उत्पन्नही मिळाले.

 

) दुसरी योजना SBI Equity Hybrid Fund. ०१/०४/२००८ ह्या दिवशी ह्या योजनेमध्ये आपण रु. १०,००,००० गुंतवून पुढील मे २००८ महिन्याच्या १० तारखे पासून आपली रु. ,५०० एस डब्लू पी चालू केली होती असती, तर साधारण मार्च २००९ मध्ये बाजार ६१ टक्के खाली आल्यावर आपल्या मूळ गुंतवणुकीचे मूल्य फक्त रु. ,७४,००० उरले होते. अशा वेळी खचून जाता ज्यांनी आपली गुंतवणूक चालू ठेवली त्याच बरोबर आपली रु. ७५०० ची एस डब्लू पी चालू ठेवली त्यांच्या गुंतवणुकीत वाढ होऊन जानेवारी २०१० मध्ये मूळ गुंतवणुकीचे मूल्य पुन्हा रु. १० लाखापेक्षा जास्त झाले. २०२०च्या मार्च महिन्यातील शेअर बाजारातील ४०% पडझडीनंतर हि दि.२३/०३/२०२० रोजी मूल्य रु. ११,०६,७३२ आहे . त्याच बरोबर गेल्या १४३ महिन्यात मासिक रु. ,५०० प्रमाणे एकंदर रु. १०,७२,५०० इतके उत्पन्न हि मिळाले.

 

इथे कोणत्याही विशिष्ट म्युच्युअल फंडाच्या योजनांची जाहिरात नाही, इक्विटी हायब्रीड कॅटेगरी मध्ये असे बरेच फंड आहेत ज्यांनी चांगला परतावा दिलेला आहे. आपला आर्थिक नियोजनकार आपल्याला फंड निवडीसाठी मदत करतील. म्युच्युअल फंडातील गुंतवुकीत धैर्य आणि संयम ज्यांनी दाखवला त्यांचे कधीच नुकसान झाले नाही हा इतिहास आहे. सध्या बाजार जरी ४०% खाली आला असला तरी खचून जात आपली गुंतवणूक कायम ठेवा. आपल्या आर्थिक उद्दिष्टाप्रमाणे आपली एस डब्लू पी चालू ठेवा. भारताच्या सुधृढ अर्थव्यवस्थेवर विश्वास ठेवा. दीर्घकालीन गुंतवणुकीतून आपले निवृत्तिनियोजन सुखकारक करा.

धन्यवाद!

 

- निलेश तावडे

(लेखक हे २० वर्ष म्युच्युअल फंड क्षेत्रात कार्यरत होते, सध्या ते आर्थिक नियोजनकार आहेत.)

९३२४५४३८३२

nilesh0630@gmail.com

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.