नाशिकमध्ये लॉकडाऊनला नागरिकांचा प्रतिसाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Mar-2020
Total Views |


nashik bazar_1  



नाशिक
: नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊन ला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. आज गुढीपाडवा सण असूनही शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या मेनरोड, रविवार कारंजा येथे जीवनावश्यक वस्तू जसे किराणा माल व मेडिकल दुकाने वगळता सर्वच दुकाने बंद असल्याचे दिसले.



तसेच
, किराणा माल दुकानात देखील सुयोग्य अंतर राखत खरेदीस नागरिकांनी प्राधान्य दिले होते. राष्ट्रीय महामार्ग क्र.अर्थात मुंबई-आग्रा महामार्गावर वाहतूक नसल्याचे दिसून आले. शहरातील सर्वच रस्ते हे बंद करण्यात आले होते. तसेच, ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तुरळक प्रमाणात रस्त्यावर दिसणाऱ्या नागरिकांना पोलिसांकडून कारणांची विचारणा करण्यात येत होती. शहरातील पेट्रोल पंपावर देखील तुरळक वाहने असल्याचे दिसून आले. दुचाकी साठी दिवसाला १०० व चारचाकी साठी दिवसाला १००० रुपयांचे पेट्रोल वितरित करण्यात यावे, या नियमांचे काटेकोर पालन पेट्रोल पंप कर्मचाऱ्याकडून केले जात आहे. तसेच, नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील विविध दुकाने, भाजीपाला विक्री केंद्र आदी ठिकाणी सुरक्षित अंतरासाठी पांढरे पट्टे मारून आखणी करण्यात आली आहे. त्याचे नागरिक पालन करताना दिसून आले.



सराफ बाजाराला
५० कोटींचा फटका



काल साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी नेहमी वर्दळ असणारा सराफ बाजार एकदम शांत दिसून आला. सणासुदीच्या मुहूर्तवर येथे सोने खरेदीची मोठी उलाढाल होत असते. मात्र
, काल सराफ बाजार बंद ठेवण्यात आल्याने सुमारे ५० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याची माहिती सराफ असोसिएशन च्या वतीने देण्यात आली. तसेच, शहरातील वाहन खरेदी, रिअल इस्टेट यांना देखील कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊन ची झळ बसल्याचे दिसून आले.

@@AUTHORINFO_V1@@