मुख्यमंत्री म्हणतात सौम्यपणे वागा, लाठीमार नको

25 Mar 2020 15:38:25

Uddhav Thackeray_1 &
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह देशामध्ये लॉकडाऊन जारी केला गेला. तरीही नागरिकांकडून त्याचे पालन केले गेले नाही. काही ठिकाणी कलम १४४चा भंग करताना दिसले. त्यानंतर पोलिसांनी आक्रमक पवित्र घेत विनाकारण बाहेर पडणाऱ्यांना कधी उठाबश्या तर कधी दंडुका असा पवित्रा राह्याभारात अवलंबला गेला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाहेर पडणाऱ्या लोकांशी सौम्यपणे वागा आणि त्यांच्यावर थेट लाठीमार करू नका, असे निर्देश राज्य पोलीस आणि शहर पोलिसांना दिले आहेत.
 
कोरोणाचा प्रादुर्भाव अधिक होऊ नये यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने अनेक निर्बंध लादले. गर्दी करू नये, गरज नसल्यास उगाच घराबाहेर पडू नये अशा गोष्टी अनेकवेळा पंतप्रधान तसेच राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासह अनेक नेत्यांनी सांगितले. परंतु, तरीही काही लोकांनी संचारबंदी चालू असताना घराबाहे पडले आणि यांना आवरण्यासाठी पोलिसांना दंडुक्याचा वापर करावा लागला. यासंदर्भात अनेक व्हिडियो समोर आले. अनेक प्रसारमाध्यमांनी हे राज्यभरातील सर्व चित्र दाखवले.
 
परंतु, काही ठिकाणी नागरिकांना विचारपूस करण्याआधीच पोलिसांकडून चोप दिला जात असल्याचं व्हिडियोमधून समोर आले. यावर जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी यासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याकडे तक्रार केली. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारे ट्रक अडवले जात आहेत. तसंच पेट्रोल पंपही बंद करण्यात आले असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली. पालघर येथे भाजीपाल्याची वाहतूक करणारे ट्रक अडवले जात आहेत. तसंच काही ठिकाणी पोलीस हे लोकांना चोप देताना व्हिडिओंमध्ये दिसत आहे. मेहता यांनी सचिवांसोबत झालेल्या आढावा बैठकीत या सर्व बाबी निदर्शनास आणून दिल्या. तसंच या संदर्भात मुख्यमंत्र्यांनाही माहिती दिली.
 
 
Powered By Sangraha 9.0