परदेशातून आलेले धर्मप्रचारक मशिदीत लपून बसले

25 Mar 2020 16:41:46
Ranchi Massjid_1 &nb


कोरोनाच्या भीतीने ग्रामस्थांनी दिली पोलीसांत माहिती

 

रांची : झारखंडची राजधानी असलेल्या रांची शहरात एका मशिदीतून १२ परदेशी मौलवींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. यापूर्वी पाटणा शहरात असे प्रकरण उघडकीस आले आहे. रांचीतील तमाड जिल्ह्यातील राडगाव मशिदीत लपून बसलेल्या या मौलवींपैकी तिघेजण चीनमधून तर उर्वरित किर्गिस्तान आणि कझाकिस्तानातून आले आहेत.
 
 
 
मा नेंनाई, ये देहाइ, मा मेरली, अशी चीनहून आलेल्या मौलवींची नावे आहेत. तर किर्गीस्तानातून नूर करीम, नारलीन, नूरगाझिन, अब्दुल्ला हे चौघे आले आहेत. तर कझाकिस्तानातून मिस्नलो, साकिर, इलियास आदी जणांची नावे कळू शकली आहेत. चौकशित त्यांनी स्वतःला धर्मप्रचारक असल्याचे म्हटले आहे. महिनाभरापासून ते भारतात आहेत. १९ मार्च रोजी ते रांचीहून बसने जमशेदपूरला निघाले होते. या दरम्यान तमाड येथे रडगाव येथे एका मशिदीत थांबले होते. प्रशासनाने कोरोना संदर्भात केलेल्या लॉकडाऊनमुळे गेले पाच दिवस ते कुठेही जाऊ शकले नाहीत,.
 
 
 
त्यांच्याबद्दल गावात कुणालाही माहिती नव्हती. मात्र, कोरोनाचे भय जसजसे वाढत गेले तशी ग्रामस्थांना कुणूक लागली. पोलीसांनी या ठिकाणी जात हस्तक्षेप केल्यानंतर या ११ जणांचा शोध लागला. पोलीसांनी चौकशी करून त्यांना सध्या विलगिकरण कक्षात ठेवले आहे. एका हिंदी वृत्तसमुहाच्या हवाल्यानुसार, पोलीस अधिकारी अजय कुमार यांनी माहिती दिली की, "कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. या सर्वांची कसून चौकशी केली जाणार आहे. त्यांच्याकडे असलेल्या ओळखपत्रांचीही तपासणी होत आहे. सर्वांचे पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत."
Powered By Sangraha 9.0