तीन दिवसांत पश्चिम रेल्वेला १०७ कोटींचे नुकसान

25 Mar 2020 19:03:38

WR_1  H x W: 0




मुंबई
: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरातील रेल्वे सेवा सोमवारपासून बंद असल्याने रेल्वेला १०७ कोटींचे नुकसान सोसावे लागले आहे. कोरोनामूळे ३१ मार्चपर्यंत रेल्वे सेवा बंद करण्यात आली. यामुळे मुंबई उपनगरीय रेल्वेला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. २२ ते २४ मार्च या दिवसांत पश्चिम रेल्वेला तब्बल १०७ कोटी ८ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले.



कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमी रविवारी २२ मार्चला जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. या दिवशी अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांवरसाठीच मुंबई उपनगरीय लोकल धावली. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने देशभरातील रेल्वे सेवेला २३ मार्चपासून ब्रेक लावण्यात आला. यामुळे मुंबई उपनगरीय रेल्वेला पुढील ९ दिवसांत १,२०० कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान, पश्चिम रेल्वे मार्गावरुन दररोज ३८ लाख प्रवासी प्रवास करतात. सध्या कोरोनामुळे उपनगरीय रेल्वे सेवा बंद करण्यात आल्याने पश्चिम रेल्वे प्रशासनाला आथिॅक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. २२ मार्चला ७८.५० कोटी तर २३ व २४ मार्च या दोन दिवसांत २८.५८ कोटी असे एकूण १०७ कोटी ८ लाख रुपयांचे नुकसान पश्चिम रेल्वे प्रशासनाला झाले आहे.
Powered By Sangraha 9.0