शाहीनबागेतली शेरनी पोलीसांना देतेय शाप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Mar-2020
Total Views |
ShahinBaugh1_1  
 
 

महिलेचा व्हीडिओ व्हायरल

 
 
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून अपेक्षित घडामोड होती, ती अखेर मंगळवार दि. २४ मार्च रोजी घडली. दिल्ली पोलीसांनी अखेर शाहीनबागेतील सुरू असलेल्या आंदोलकांना चांगलाच दणका घेत परिसर रिकामी केला, दिल्ली पोलीसांना दिलेल्या निर्देशानुसार, संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त लावत ही कारवाई करण्यात आली. आंदोलन स्थळी असलेले तंबू आणि खुर्च्याही हटवल्या. तसेच काही उपद्रवी आंदोलकांना ताब्यातही घेण्यात आले. आंदोलकांना ज्यावेळी प्रेमाची भाषा समजली नाही त्यावेळीच दंडुक्याचा धाक दाखवत पोलीसांना ही कारवाई करावी लागली. मात्र, शाहीनबागच्या कथित शेरनी संबोधल्या जाणाऱ्या आंदोलक महिलांनी पोलीसांनाही शिव्या शाप दिले. कोरोनाशी लढण्यासाठी जिथे संपूर्ण देशात लॉकडाऊन असताना इथे मात्र एकत्र येत कोरोनाचा धोका अधिक वाढवत आहेत.
 
 
 
 
 
 
 
मंगळवारी जेव्हा पोलीसांनी आपली कारवाई सुरू केली होती. त्यावेळी आंदोलकांचा मोठा आक्रोश दिसून आला. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. एक आंदोलक महिला पोलीसांना शिव्या शाप देत होती. तुम्हाला आमची हाय लागेल, तुमचं भलं होणार नाही, असे भाव तिच्या चेहऱ्यावर होते. पोलीस या महिलेला जागेवरून हटवत होते. कोरोनाचा धोका या भागातही असल्याने तिचा जीव वाचावा यासाठी हे सर्व प्रयत्न प्रशासन करत असताना आंदोलक मात्र, पोलीसांना शिव्या शाप देण्यात गुंग होते. आमचा रोजा सुरू आहे, तुम्हाला हाय लागेल, असा आकांडतांडव या महिलेने काहीवेळ सुरूच ठेवला.
 
@@AUTHORINFO_V1@@