कोकणातील गावांच्या वेशी बंद!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Mar-2020
Total Views |
kokan _1  H x W
 

 
चाकरमान्यांना 'नो एन्ट्री'

 
मुंबई (प्रतिनिधी) - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कोकणातील काही गावांच्या वेशी बंद करण्यात आल्या आहेत. ग्रामस्थांनीच एकमताने निर्णय घेऊन आपआपल्या गावच्या वेशी झाड, दगड किंवा बांबूचे कुंपन करुन बंद करुन घेतल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग गावात पसरु नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे.
 
 

kokan_1  H x W: 
 
 
 
 
कोरोनाच्या धास्तीने मुंबई-पुण्यातील चाकरमान्यांनी कोकणातील आपल्या गावची वाट धरली आहे. कोकणात जाणाऱ्या अशाच काही प्रवाशांना पोलीसांनी आज सकाळी कशेडी घाटात रोखले. यावेळी त्यांच्या हातावर 'होम काॅरेन्टाईन'चे शिक्के मारण्यात आले. अशा परिस्थितीत मात्र, कोकणातील काही गावातील ग्रामस्थांनी आपल्या वेशी बंद करुन घेतल्या आहेत. गावच्या सीमेवर बांबूचे कुंपन घालून त्यावर प्रवेश बंदीचा फलक लावण्यात आला आहे. तर काही गामस्थांनी रस्त्यावर माती किंवा दगडांचा धिगारा टाकून प्रवेश बंद केला आहे. का हींनी रस्त्यावर झाड आडवे करुन टाकले आहे.
 
 
 

kokan_1  H x W: 
 
 
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून शहरातील लोकांनी आपआपल्या गावाची वाट धरली आहे. मात्र, अशावेळी हे लोक गावातील लोकांच्या सुरक्षेचा विचार करत नाही आहेत. कोकणातील किनाऱ्यालगतच्या गावांनी देखील पर्यटनावर पूर्ण बंदी आणली आहे. कोणत्याही प्रकारच्या सुविधा पर्यटकांना न देण्याबाबत ग्रामपंचायतीमध्ये निर्णय झाला आहे. अशा परिस्थितीत आजही काही गावांमध्ये पर्यटक आणि चाकरमान्यांचा धुमाकूळ सुरू आहे.
@@AUTHORINFO_V1@@