सॅनिटायझरमध्ये आढळला केस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Mar-2020
Total Views |
sanitizer e_1  
 
 
 
 
नाशिक : चुंचाळे शिवारातील लस देण्याचे प्रकरण ताजे असतानाच परिसरातील एका मेडिकलवर विकल्या जाणाऱ्या सॅनिटायझरमध्ये केस आढळल्याने परिसरामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत . विशेष म्हणजे प्रभागातील नगरसेवक राकेश दोंदे हे सॅनिटायझर खरेदीला गेले असता त्यांनाच सदर केस असलेली बाटली मिळून आली . याबाबत सविस्तर वृत्त असे की नगरसेवक दोंदे हे अंबड लिंकरोडवरील एका मेडिकलमध्ये सनिटायझर व मास्क घेण्यासाठी गेले होते . यावेळी त्यांनी ९० रुपये देऊन सॅनिटायझर व १५० रुपये देऊन मास्क खरेदी केले.
 
 
 
दरम्यान सदर सॅनिटायझरची बाटली ही सील पॅक असताना यामध्ये केस आढळून आल्याने याबाबत दोंदे यांनी सदर मेडिकलच्या सेवकाला विचारणा केली असता सदर सॅनिटायझर कंपनीकडून सील पॅक आले असल्याचे त्यांनी सांगितले दरम्यान , नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी सॅनिटायझरचा काळा बाजार करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली होती बॅण्डेड कंपन्यांच्या नावावर अशा प्रकारचे सॅनिटायझर तर विकले जात नाही , असा सवाल आता उपस्थित झाला आहे . दरम्यान , या प्रकरणी अन्न , औषध प्रशासन विभागाला तक्रार करणार असल्याचे नगरसेवक दोंदे यांनी सांगितले . सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी बंद पाळला गेला तो फक्त नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी . प्रशासनातर्फे वारंवार हात धुवा , सॅनिटायझरचा वापर करा , अशा स्वरुपात प्रबोधन केले जात असताना सॅनेटायझरच्या सीलपॅक बाटलीत केस आढळणे , ही गंभीर बाब आहे . यावरून अशी टोळी कार्यरत असल्याचे जाणकारांनी सांगितले .
कंपनीचे सील पैक बाटलीत केस नेमका आलाच कुठुन ? म्हणजे याचा अर्थ असा की कुणीतरी सॅनिटायझरचा काळाबाजार करीत आहे . या प्रकरणी कारवाई करण्यात यावी व सदर कंपनीची चौकशी करण्यात यावी या संदर्भातील निवेदन लवकरच देण्यात येणार आहे .-  राकेश दोंदे , नगरसेवक
@@AUTHORINFO_V1@@