कौतुकास्पद ! कोरोनाग्रस्तांसाठी हा खेळाडू देणार ६ महिन्याचा पगार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Mar-2020
Total Views |

bajrang punia_1 &nbs
 
 
नवी दिल्ली : जगभरामध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने अनेकांचे जीव गेले आहेत. अशामध्ये सर्व देशांमध्ये वैद्यकीय आणीबाणी जारी केली आहे. अशामध्ये सर्व ठिकाणी आर्थिक अडचणी येत असताना काही स्वतःहून मदतीसाठी हात पुढे केले आहेत. क्रीडा क्षेत्रालाही कोरोनाचा चांगलाच फटका बसला आहे. अशामध्ये भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने स्वतःचा सहा महिन्यांचा पगार हा कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी देणार असल्याचे घोषित केले .
 
 
कोरोनाचा फटका हा क्रीडा क्षेत्राला बसला आहे. अनेक मोठ्या स्पर्धा पुढे ढकलल्या आहेत. अशामध्ये बजरंग पुनियाने आपले सहा महिन्यांचे वेतन हरयाणा सरकारच्या करोनाग्रस्तांच्या मदत निधीमध्ये दान केले आहे. ट्विटरवरून त्याने याबाबत घोषणा केली. “सध्या करोना विषाणूमुळे जगभरात जे काही सुरू आहे, त्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलावी असंच मला तरी वाटते. कारण आताचा काळ साऱ्यांसाठीच कसोटीचा आहे”, असे पुनियाने सांगितले. “ऑलिम्पिक समितीने नियोजित वेळापत्रकानुसार स्पर्धा सुरू केली आणि इतर देशाचे खेळाडू सहभागी झाले तर आम्हालाही जावेच लागेल. पण सध्या तरी त्यांनी परिस्थिती सामान्य होण्याची वाट पाहायली हवी. कारण जिवंत राहिलो तरच खेळू शकतो.. जीव गमवावा लागला तर ऑलिम्पिक खेळून काय उपयोग?”, असे रोखठोक मत पुनियाने व्यक्त केले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@