पुण्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी

    दिनांक  24-Mar-2020 17:53:10
|

rain_1  H x W:नाशिकच्या काही भागातही बरसल्या सरी


पुणे : कोरोना विषाणूचे संक्रमण वाढू नये म्हणून गेल्या रविवारपासून घरातच असलेल्या पुणेकरांना आज अचानक पावसाने दर्शन दिले. पुण्याच्या दक्षिण भागात अनेक ठिकाणी संध्याकाळी पाचच्या सुमारास अवकाळी पावसाला सुरुवात झाली. सिंहगड रोड, कात्रज, आंबेगाव या भागात पाऊस पडल्याची माहिती मिळाली आहे.


राज्यात संचारबंदी असल्यामुळे रस्त्यावर वाहतूक कमी आहे. पण जे अत्यावश्यक सेवेत काम करतात. त्यांची अचानक आलेल्या पावसामुळे धांदल उडाली. पुण्यात गेले काही दिवस दुपारच्या वेळी कडक ऊन आहे. रात्रीही उकाडा जाणवतो. फक्त पहाटेच्या वेळी हवेत गारवा असतो.


वेधशाळेने पुणे आणि परिसरात त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी येते चार ते पाच दिवस पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्याप्रमाणेच मंगळवारी संध्याकाळी पाऊस झाला. पुण्याबरोबरच नाशिकच्या काही भागातही पावसाच्या सरी बरसल्या आहेत.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.