पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; भारतात २१ दिवसांसाठी 'लाॅकडाऊन'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Mar-2020
Total Views |
corona _1  H x
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली(विशेष प्रतिनिधी) : करोना महासाथीचा सामना कऱण्यासाठी पुढचे २१ दिवस देशात पूर्णपणे लॉकडाऊन असणार आहे. या काळात एकाही नागरिकाने घराबाहेर पडायचे नाही, आपल्या घराबाहेर लक्ष्मणरेखा आखून घ्या. घराबाहेर पडल्यास तुमचे संपूर्ण कुटुंब उद्धस्त होऊ शकते, त्यामुळे पुढचे २१ दिवस सोशल डिस्टन्सिंगचे काटेकारपण पालन करा, असे गंभीर आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना मंगळवारी रात्री ८ वाजता केले.
 
 
 
करोना महासाथीचा प्रादुर्भाव देशात झपाट्याने वाढतो आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे, मात्र आता संपूर्ण देशभरात २१ दिवसांसाठी पूर्णपणे लॉकडाऊन लागू करण्यात येत आहे. म्हणजे पुढचे २१ दिवस एकाही नागरिकाने घराबाहेर पडायचे नाही, पूर्णपणे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करायचे आहे. करोना संक्रमण साखळी तोडण्यासाठी २१ दिवस लागतात, त्यामुळे पुढचे २१ दिवस भारताचे भवितव्य ठरविणारे आहेत. त्यामुळे देशात जिथे आहात, तिथेच थांबा. याचे कसोशिने पालन न केल्यास देश २१ वर्षे मागे जाईल, तुमचे संपूर्ण कुटुंब उध्वस्त होण्याचा धोका आहे. तुमच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून मी हे आवाहन करीत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
 
 
 
 
देशातील आरोग्य सेवेसाठी आणि करोना उपाययोजनांशी संबंधित आरोग्यविषयक खर्चासाठी १५ हजार कोटी रूपयांची घोषणा करण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारे अतिशय वेगवान हालचाली करीत आहेत. जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा असून त्यांचा पुरवठा अविरतपणे उपलब्ध राहणार आहे. सर्व राज्य सरकारांचे पहिले प्राधान्य आता आरोग्यक्षेत्रास आहे. या लढाईमध्ये खासगी क्षेत्रदेखील सरकारसोबत असून खासगी रूग्णालये आणि प्रयोगशाळादेखील करोनाचा सामना करण्यासाठी सज्ज आहेत. तसेच 'कोरोना' या शब्दाचा अर्थ उलगडताना त्यांनी 'को' म्हणजे 'कोई', 'रो' म्हणजे 'रोड पर' आणि 'ना' म्हणजे 'ना निकले' थोडक्यात 'कोई रोड पर ना निकले' असा केला आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@