कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचे देशाला संबोधन

24 Mar 2020 12:17:44


modi_1  H x W:




नवी दिल्ली
: जागतिक महामारी घोषित झालेल्या कोरोना आजाराने भारतही थैमान घातले आहे. देशातील ३० राज्य व केंद्रशाषित प्रदेश लॉकडाऊन करण्यात आले आहेत. केंद्र व राज्य सरकार वारंवार जनतेला खबरदारी घेण्यास तसेच घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन करत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशातील जनतेला संबोधित करणार आहेत. याबाबत त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटरवर ही माहिती दिली. ते ट्विटमध्ये म्हणतात की, 'जागतिक महामारी कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावासंबंधित काही महत्त्वाच्या गोष्टींबाबत देशातील जनतेशी संवाद साधायचा आहे. आज, २४ मार्च रोजी रात्री ८ वाजता याबाबत देशाला संबोधित करणार आहे.'







यापूर्वी १८ मार्च रोजी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे त्यांनी जनतेशी संवाद साधला होता. यावेळी बोलताना मोदींनी देशात
२२ मार्च रोजी 'जनता कर्फ्यू' पाळण्याचे आवाहन केले होते. रविवारी, २२ मार्च सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू असणार आहे, तसेच याचे जनतेने पालन करावे. या दरम्यान कोणीही घराबाहेर जाऊ नये, असे आवाहन देखील मोदींनी केले होते.

 

Powered By Sangraha 9.0