दिलासादायक ! राज्यात १३ रुग्ण कोरोनामुक्त

    दिनांक  24-Mar-2020 11:34:01
|

katurba_1  H xमुंबई : राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असताना दाखल झालेल्यांपैकी १३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, ही देशवासीयांच्या दृष्टीने निश्चितच दिलासादायक बातमी आहे. मुंबईतील महालक्ष्मी येथील कस्तुरबा रुग्णालयात हे कोरोना संशयित आणि कोरोनाबधितांवर उपचार करणारे राज्यातील प्रमुख रुग्णालय झाले आहे.


याच रुग्णालयातून १२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत
, तर पुण्यात प्रथम दाखल झालेला रुग्ण रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना ही निश्चितच देशवासीयांच्या दृष्टीने दिलासादायक बातमी आहे. कस्तुरबा रुग्णालयातून डॉ. दक्षा शहा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. डॉ. दक्षा शहा म्हणाल्या की, डॉक्टरांचे अथक प्रयत्न आणि उपचारांना रुग्णांनी दिलेला प्रतिसाद यामुळे हे शक्य झाले आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.