राज्यात शंभरी तर देशात ५००वर कोरोनाचे रुग्ण

    दिनांक  24-Mar-2020 11:07:30
|

corona_1  H x W
 
 
मुंबई : राज्यासह देशभरामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चाललेली आहे. अशामध्ये महाराष्ट्रामध्ये संचारबंदी लागू केली आहे. तरीही नागरिक घराबाहेर पडताना दिसत आहेत. मंगळवारी सकाळी राज्यात ४ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे आता राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १०१ वर पोहचली आहे. देशामध्येही कोरोनाग्रस्तांची संख्या ५०३वर पोहोचली आहे. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी घरीच राहण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. हा आकडा वाढू नये यासाठी केंद्र तसेच राज्य सरकार आटोकाट प्रयत्न करत आहेत.
 
 
राज्यात साताऱ्यामध्ये १, पुण्यात ३ अशा ४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रामधील वाढता आकडा हा चिंताजनक असल्यामुळे राज्य सरकारने कठोर पाउले उचलेली आहेत. महाराष्ट्रानंतर सर्वाधिक रुग्ण आढळत आहे ते केरळमध्ये ही संख्या ६० च्या वर पोहचली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ३० राज्ये लॉकडाउन करण्यात आली आहेत.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.