ही वेळ उत्सवाची नाही; राज्याला संकटातून बाहेर काढणार : शिवराज सिंह

23 Mar 2020 21:19:29

shivraj _1  H x


शिवराज सिंह चौहान यांचे जनतेला आश्वासन


भोपाळ : मध्यप्रदेशात पुन्हा भाजपने विजयश्री खेचून आणला आहे. कमलनाथ सरकारच्या १६ आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर सोमवारी भाजप नेते शिवराज सिंह चौहान यांनी चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यापूर्वी त्यांनी दिलेली प्रतिक्रिया खूपच बोलकी आणि विश्वासार्ह होती. ही वेळ उत्सव साजरा करण्याची नाही, राज्याला आणि देशाला कोरोनारूपी महामारीच्या विळख्यातुन बाहेर काढणे महत्त्वाचे आहे. भाजप मला मातेसमान आहे, त्या मातेचे उपकार मी विसरणार नाही. जाणाऱ्या सरकारने जाता जाता सारंकाही विस्कटून गेले आहे. राज्याची विस्कळीत घडी बसवण्याचे आव्हान आहे, प्रशासनात पुन्हा सुसूत्रता आणण्याचे काम करायचे आहे. शपथविधी झाल्यानंतर कोरोनाशी लढण्यासाठी रणनीती आखण्याची बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. संक्रमण हे देशभरात वेगाने पसरत असून ते तोडण्यासाठी आता आम्ही सरकार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदीं सोबत उभे राहून या रोगाशी लढाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.



Powered By Sangraha 9.0