एक मदतीचा हात गरजू आणि रोजंदारांसाठी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Mar-2020
Total Views |
help _1  H x W:



मुंबई : कोरोनाच्या दहशतीमुळे सर्व उद्योग, व्यवसाय ठप्प आहेत त्यामुळे काम मिळेल तेव्हा भाकरी, अशी काहीशी अवस्था असणाऱ्या गरजू, गरीब आणि रोजंदारीवर आपलं कुटुंब पोसत असलेल्या मजुरांसाठी एक हात पुढे करण्याचे आवाहन मेकिंग द डिफ्रन्स (www.mtdngo.org) या संस्थेतर्फे केले जात आहे. यासह माय ग्रीन सोसायटी, लायन्स क्लब, बायक हॉटेल रीट्रीट, एनएसएस, भारत विकास परिषद आदी संस्थांनीही या उपक्रमात पुढाकार घेतला आहे. प्रत्येक गरजू परिवाराला ३ किलो तांदूळ, २ किलो पीठ, अर्धा किलो तेल, मीठ आणि इतर वस्तूंचे वीतरण या संस्थांच्या माध्यमातून केले जाणार आहे.


सर्वसामान्य व्यक्तींनी यात पुढाकार घ्यावा आणि मदतीचा एक हात पुढे करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. मदतीसाठी किंवा अधिक माहितीसाठी रणजित - ९७६९५५९८८९, सुशील जाजू ९८२१०९२३२६, गोपाळ - ८६५७२०९७४९ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केलं आहे.
@@AUTHORINFO_V1@@