विमानात प्रवासी शिंकला म्हणून पायलटने घेतली कॉकपीटमधून उडी

23 Mar 2020 12:51:27
airoplane_1  H
 
 
 


 
पुणे : कोरोना विषाणूची दहशत जगभरात पसरलेली असताना आता पुण्यातून एक धक्कादायक बातमी उघड झाली. पुण्यातील एअर एशिया विमानाच्या पायलटने प्रवासी शिंकला म्हणून पायलटने कॉकपीटमधून थेट खाली उडी घेतली. हा प्रकार विमान उड्डाणासाठी तयार होत असताना घडला. संकटकाळी अशाप्रकारे विमानातून बाहेर उडी घेतली जाते. पहिल्या रांगेतील प्रवासी शिंकल्याने विमानात प्रचंड घबराट पसरली.
 
 
 
शुक्रवारी एअर एशियाचे एक विमान दिल्लीसाठी निघणार होते. सर्वकाही सुरळीत सुरू होते. अचानक एक प्रवासी जोरात शिंकला. या प्रवाशाला सर्दीचा त्रास होत होता. अशावेळी समजूतीने घेण्याऐवजी पायलटने घाबरून थेट कॉकपीट बाहेर उडीच घेतली. आपत्कालीन दरवाजातून तो बाहेर पडला. काही प्रवाशांनी आश्चर्य व्यक्त केले तर काही प्रवासी प्रचंड घाबरले होते. विमानातील क्रू मेबर्सने मागील दरवाजा उघडला. शिंकणाऱ्या प्रवाशाला पुढील दरवाजातून खाली उतरवले तर इतर प्रवाशांना मागील बाजूने खाली उतरवण्यात आले. सर्व प्रवाशांचा कोरोना संदर्भातील आवश्यक चाचण्या घेण्यात आल्या सुदैवाने या प्रवाशांपैकी कुणीही कोरोनाग्रस्त आढळले नाही.


 
Powered By Sangraha 9.0