कोरोनाचे उत्पत्ती केंद्र असलेल्या वुहानमध्ये जनजीवन सुरळीत: लाॅकडाउन उठवले

23 Mar 2020 15:02:07
corona _1  H x

भारतामध्ये कोरोनाचा कहर कायम

मुंबई (प्रतिनिधी) - कोरोना व्हायरसचे उत्पत्ती केंद्र मानल्या जाणाऱ्या चीनमधील वुहान प्रांतातील जनजीवन पुन्हा एकदा सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे. याठिकाणी दोन महिन्यांपासून असलेल्या लाॅकडाउन वरील निर्बंध प्रशासनाने शिथील केले आहेत. त्यामुळे सोमवारपासून नागरिकांनी सतर्क राहून दैनंदिन कामकाजाला सुरुवात केली आहे.
 
 
 
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच चीनच्या वुहान प्रांतात परिस्थिती सुरळीत होण्याच्या मार्गावर आहे. वुहानमधूनच कोरोनो व्हायरसच्या संसर्गाला सुरुवात झाली होती. गेल्या दोन महिन्यांपासून चीनमध्ये लाॅकडाउनची परिस्थिती होती. मात्र, सोमवारी चीन प्रशासनाने लाॅकडाउनवरचे काही निर्बंध हटवले. त्यामुळे मध्य चीनच्या काही शहरांमधील रहिवासी सोमवारी सकाळी बाजारांमध्ये फिरताना दिसले. गेल्या काही आठवड्यांनंतर प्रथमच नागरिक रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. तसेच शनिवार आणि रविवारी वुहान शहरातील रेल्वे वाहतूकही तुरळक प्रमाणात सुरू करण्यात आली. निर्बंध हटवल्यानंतर शहरात दाखल झालेल्या पहिल्या रेल्वेने अंदाजे १ हजार प्रवाशांनी (कामगारांनी) मोठ्या शहारांपर्यंत प्रवास केला.
 
 
 
 
( वुहान प्राणिसंग्रहालयातील सोमवारचे एक दृश्य) 
corona_1  H x W 
 
 
 
नागरिकांच्या शाररिक तापमानाची तपासणी करुनच त्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. वुहानमध्ये अडकलेल्या अनिवासी नागरिकांना शहराबाहेर पडण्यास २३ जानेवारीपासून निर्बंध घालण्यात आले होते. मात्र, आता या अनिवासियांना शहराबाहेर पडण्यासाठी अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. चीनमध्ये कोरोना व्हायसरच्या रुग्णांच्या संख्येत आता घट होत आहे. चीनमधील कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या ८१ हजार एवढी असून ३,२७० रुग्णांचा मृ्त्यू झाला आहे. सोमवारी चीनमध्ये कोरोनाचे ३९ नवीन रुग्ण सापडले. मात्र, नॅशनल हेल्थ कमिशने दिलेल्या माहितीनुसार, हे रुग्ण बाहेरील देशांमधून चीनमध्ये आले आहेत. 
Powered By Sangraha 9.0