कोरोनाचा धोका टाळण्यासाठी मराठी कलाकारांकडून आवाहन!

    दिनांक  23-Mar-2020 17:34:23
|
corona actors_1 &nbs

जनजागृतीसाठी कलाकारांचे खास आवाहन


मुंबई :
संपूर्ण जगात धुमाकूळ घालणऱ्या कोरोना व्हायरसने भारतातही थैमान घालायला सुरुवात केली आहे. कोरोना व्हायरसचा दिवसागणित वाढत चाललेला प्रभाव पाहता सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. तसंच लॉकडाऊनचा आदेश गांर्भायाने पाळत घरात सुरक्षित राहण्याचे आवाहन सर्वच स्तराकडून करण्यात येत आहे. यासाठी आता मराठी कलाकारही पुढे सरसावले आहेत.


स्वप्निल जोशी, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, अमृता खानविलकर यांच्यासह अनेक कलाकारांनी एकत्रितपणे कोरोना व्हायरसपासून सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान 'जनता कर्फ्यू'ला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल आभारही मानले आहेत. तसंच या व्हिडिओतून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी काही खास टिप्सही देण्यात आल्या आहेत.
स्वच्छता पाळा, गर्दी टाळा, खोकताना, शिंकताना नाक-तोंडावर रुमाल धरा, हात धुवा, घरातील अन्न खा, यांसारख्या टिप्स यात देण्यात आल्या आहेत. तसंच घाबरुन न जाता जागरुक राहण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पाळीव, वन्य प्राण्यांमुळे कोरोना पसरतो या गैरसमजूतीमुळे घरातील पाळीव प्राण्यांना बाहेर सोडण्यात येते तर ते टाळावे, असेही सांगण्यात आले आहेत.


महाराष्ट्रात कोरोनाचे एकूण ८९ रुग्ण असून देशात कोरोनाबाधितांची संख्या ४०० हून अधिक झाली आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी कोरोनाग्रस्तांचा आकडा पाहता काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. याचबरोबर शासनाने दिलेल्या आदेशांचे पालन करणेही महत्त्वाचे आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.