मध्यप्रदेशात पुन्हा भाजपची सत्ता!

23 Mar 2020 20:46:27

shivraj_1  H x



शिवराज सिंह चौहान आज चौथ्यांदा घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ


मध्यप्रदेश : मध्य प्रदेशमध्ये ९ मार्च पासून सुरु असणाऱ्या राजकीय सत्ता नाट्यावर अखेरीस आज पडदा पडणार आहे. कमलनाथ यांनी पदाचा राजीनामा दिल्यानांतर, आज संख्याबळ सिद्ध करून भाजपचे शिवराज सिंह चौहान हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. विशेष म्हणजे मध्य प्रदेश मध्ये चौहान यांची चौथ्यांदा मुख्यमंत्री म्ह्णून नेमणूक होणार आहे. भोपाळ येथील राजभवनात राज्यपाल लालजी टंडन यांच्या समक्ष रात्री ९ वाजता शिवराज सिंह चौहान शपथ घेतील अशी माहिती आहे. सोमवारी काही वेळापूर्वी भाजपच्या नेते मंडळींची मध्य प्रदेशातील राजकीय घडामोडींवर आधारित बैठक पार पडली त्यांनंतर याबाबत अधिकृत घोषणा माध्यमांच्या समोर करण्यात आली.


ज्योतिरादित्य शिंदे यांनी ९ मार्च रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता त्यांच्यासोबतच अन्य २२ आमदारांनी सुद्धा काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती, यामुळे एका पाठोपाठ एक कमलनाथ सरकारचा पाया कोसळत चालला होता, आपल्याकडे बहुमत आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांना २० मार्च रोजी विश्वासदर्शी ठरावाला सामोरे जायचे होते, मात्र बहुमत चाचणीच्या अगोदरच कमलनाथ यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली.


यानंतर भाजपकडे १०७ आमदारांचे संख्याबळ आहे असे सांगत भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी दावा करण्यात आला, सुरुवातीला शिवराजसिंह चौहान आणि नरेंद्रसिंह तोमर यांच्या नावात चर्चा होती मात्र आता चौहान हेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होतील हे स्पष्ट झाले आहे.
Powered By Sangraha 9.0