एमपीएससीच्या गलथान कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका

23 Mar 2020 17:35:48


mpsc_1  H x W:



मुंबई 
: राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने
महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीने आगामी राज्यसेवा परीक्षा आणि दुय्यम सेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ५ एप्रिल रोजी होणारी राज्यसेवा परीक्षा आता २५ एप्रिलला, तर दुय्यम सेवा परीक्षा ३ मे ऐवजी १० मे रोजी होणार आहे. मात्र, एमपीएससी ने हा निर्णय घेण्यास उशीर केल्याने परीक्षेसाठी पुण्यात व मुंबईत थांबलेल्या विद्यार्थ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.


पुणे
, मुंबईत कोरोना विषाणूचा फैलाव वाढत असल्याने अनेक विद्यार्थी नोकरदार आपापल्या गावाकडे परतले आहे. मात्र, ५ एप्रिलला होणाऱ्या राज्य सेवा परीक्षेसाठी काही विद्यार्थी अद्यापही पुण्यात थांबले आहे. कोरोनाच्या धास्तीने शहरातील सर्व खानावळी, अभ्यासिका बंद झाल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे एमपीएससीने आगामी राज्यसेवा परीक्षेबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. मात्र एमपीएससीने राज्यात सर्वत्र राज्यात संचारबंदी सदृश्य परिस्थिती असताना रविवारी(ता.२२) आगामी परीक्षा पुढे धकल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे पुण्यात व मुंबईत थांबलेल्या विद्यार्थ्यांना २५ एप्रिलपर्यंत राहायचे कसे आणि खायचे काय प्रश्न उभा ठाकला आहे. याशिवाय घरी जायचे म्हटले तरी सर्व वाहतूक सेवा बंद आहे. त्यामुळे पुण्यात व मुंबईत अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांपुढे गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे व मुंबईत अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी शासनाने काहीतरी पावले उचलावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.



मी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटचा रहिवासी आहे. गेल्या दोन वर्षापासून एमपीएससीची तयारी करण्यासाठी पुण्यात राहतोय. पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने अनेक विद्यार्थी घरी गेले आहेत. मात्र
एप्रिलला राज्यसेवा असल्याने मी इथेच थांबलो. आता राज्यसेवा २५ एप्रिलला होणार असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. एक महिना आमच्या जेवण्याची अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे शासनाने आम्हाला घरी सोडण्याची व्यवस्था करावी.

- नितेश पटोले, विद्यार्थी.

Powered By Sangraha 9.0