राज्यात गेल्या २४ तासांत १५ रुग्णांची भर ; राज्यात रुग्णांची संख्या ८९वर

23 Mar 2020 09:55:59

mumbai_1  H x W
 
 
मुंबई : जगभरामध्ये थैमान घातलेल्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव भारतासह महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता ८९ वर पोहोचली आहे. फिलिपिन्स राज्यातून मुंबईमध्ये आलेल्या एका नागरीकाचादेखील कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे पुन्हा एकदा राज्यामध्ये भीतीचे वातावरण असले तरी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकाना काळजी घेण्यास सांगितले आहे. तसेच, गरज नसल्यास घराबाहेर पडू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.
 
 
महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे मात्र तरीही नागरिक गरज नसताना खासगी वाहनांनी घराबाहेर पडलेल्याचे चित्र सोमवारी सकाळी पहायला मिळाले. लोकलसेवा ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आली आहे. तरीही नागरिकांनी टक्सी, खासगी वाहनांचा उपयोग करत मुंबईमध्ये मुलुंड, तसेच सायन मार्गावर गाड्यांच्या लांबच लांब रंग लावल्या. यामुळे मुंबई करांना यांचे किती गांभीर्य आहे हे लक्ष्यात आले. ही गर्दी करणे चुकीचे आहे असेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. लोकांनी ३१ मार्च पर्यंत संयम पाळावा. आज जे अनावश्यक कारणाने मुंबईत जाण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर कारवाई करावी लागेल असाही इशारा राजेश टोपे यांनी दिला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0