मुंबई महापालिका उभारणार आयसोलेशन वॉर्ड

    दिनांक  23-Mar-2020 19:03:32
|
isolation ward_1 &nbमुंबई : विश्वाची समस्या बनलेल्या कोरोना विषाणूंच्या मुकाबल्यासाठी मुंबई महानगरपालिका युद्धपातळीवर उभारता येतील अशा आयसोलेशन वॉर्डसाठीच्या जागा शोधून ठेवत आहे.


रिकाम्या इमारती, फार वापरात नसलेल्या इमारती अशा ठिकाणी गरज पडल्यास फक्त दोन दिवसांमध्ये आयसोलेशन वॉर्ड उभारण्याची शक्यता महानगरपालिकेतील सूत्रांनी दिली.


आयसोलेशन वॉर्ड रिकाम्या इमारतीमध्ये किंवा वापरात नसलेल्या इमारतींमध्ये स्थापन करण्यात येऊ शकतात. गरज पडल्यास हे वॉर्ड अवघ्या दोन दिवसांमध्ये उभारता येतील अशी सोय महानगरपालिकेकडून करण्यात येईल.


सध्या कोरोनाच्या रुग्णांना व संशयितांना मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयांमध्ये ठेवण्यात आले असून तशी सुविधा उपनगरातील सेव्हन हिल्स रुग्णालयात सुद्धा उपलब्ध करण्यात आली आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.