मशिदीत लपले १२ विदेशी : सर्वांची कोरोना चाचणी होणार

23 Mar 2020 18:50:48
Ugir Muslims_1  
 



पाटणा : बिहारच्या पाटणा येथील एका मशिदीत परदेशातून आलेले काही धर्मप्रचारक लपून बसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. राजधानी शहरातील हा गजबजलेला परिसर मानला जातो. या भागात गेट क्रमांक ७४ येथे एका मशीदीत या धर्मप्रचारकांना लपवून ठेवण्यात आले असून ते एकूण बारा जण असल्याची माहिती आहे. सोमवार दि. १६ मार्च रोजी या ठिकाणी सर्वजण पोहोचले होते. परिसरात कुरबूर लागल्यानंतर स्थानिकांनी याचा छडा लावण्याचा प्रयत्न केला. प्रकरण पोलीसांत गेल्यानंतर आता सर्व १२ जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.



 
हे सर्वजण तुर्कस्तानहून आले असल्याची प्रार्थमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या वैद्यकीय चाचण्याही केल्या जात आहेत. या सर्वांना गेल्या काही दिवसांपासून धार्मिक स्थळावर लपवून बसवण्यात आले होते. बिहारमध्ये धर्माचा प्रसार प्रचार करण्यासाठी हे सर्वजण आले असल्याची माहिती आहे. त्यांच्याकडे अधिकृत पासपोर्ट आणि व्हिसा उपलब्ध आहेत. वैद्यकीय चाचणी केल्यानंतर येणाऱ्या अहवालानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
Powered By Sangraha 9.0