जमावबंदीच्या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई : राजेश टोपे

23 Mar 2020 11:55:04

rajesh tope_1  
मुंबई : “राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मुंबईत १४ आणि पुण्यात १ नवीन रुग्ण आढळला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ८९ वर आहे. यातील ८ जण संपर्कात आल्याने बाधा झाली. तर ६ जण बाहेरुन प्रवास करुन आले आहेत,” अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. “लवकरच महाराष्ट्राच्या सीमा बंद करण्याबाबत लवकरच निर्णय होईल. तसेच तूर्तास गोवा बॉर्डर सील केली आहे,” असेही आरोग्यमंत्री म्हणाले. “मीच माझा रक्षक हे महत्त्वाचे आहे. मी स्वत:ची सुरक्षा स्वत: करेन, सुरक्षित अंतर ठेवेन हे महत्त्वाचं आहे,” असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
 
 
“मुंबईत अनेक ठिकाणी पोलीस आयुक्त नजर ठेवून आहेत. त्यामुळे त्या ठिकाणची गर्दी कमी करा. महाराष्ट्रामध्ये १४४ कलम लागू असताना अनेक मुंबईकर बाहेर पडत आहे. त्यांना माझे आवाहन आहे की तुम्ही घरीच थांबा. एका ठिकाणी ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येऊ नका. त्यांच्यावर कारवाई होईल. जमावबंदीच्या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याचा पोलिसांना अधिकार आहे. रस्त्यावर पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येऊ नये, संसर्ग टाळण्यासाठी घरी राहा, अन्यथा पोलीस कारवाई केली जाईल” असेही राजेश टोपे म्हणाले.
 
 
Powered By Sangraha 9.0