असंघटित व कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही आर्थिक मदत घोषित करावी : प्रवीण दरेकर

    दिनांक  23-Mar-2020 15:07:34
|

pravin darekar_1 &nbप्रवीण दरेकर यांची राज्य सरकारकडे मागणीमुंबई : कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्य सरकाराने महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्याची घोषणा करत सरकारने चांगले पाऊल उचलले आहे. त्याबद्दल सरकारचे मनापासून अभिनंदनच करत आहोत. मात्र या काळात दैनंदिन उपजीविका करणाऱ्या कंत्राटी कामगारांना राज्य सरकारने आर्थिक मदत घोषित करावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.


उपनगरीय रेल्वे लोकल बंद झाली आहे. नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये, गर्दी टाळण्यात यावी अशा योग्य उपाययोजना सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत. सरकारी व खासगी कर्मचाऱ्यांना वर्क फॉर्म होमची सवलत देण्यात आली आहे. तसेच सरकारी, खासगी, औद्योगिक आदी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा या काळातील वेतन कापू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. पण या काळात दैनंदिन उपजिविका असणारे रिक्षा, टॅक्सी व फेरिवाल्यांच्या बाबत निश्चित धोरण अद्यापही घोषित झालेले दिसत नाही, त्यामुळे या वर्गासाठी सरकराने दैनंदिन उपजिविकेसाठी निश्चित उपाययोजन करावी असे आवाहन दरेकर यांनी राज्य सरकारला केले आहे.


लॉकडाऊनच्या काळात टॅक्सीचालक, रिक्षाचालक व फेरिवाले तसेच दूधविक्रेते, दूध वितरक, वृत्तपत्र विक्रेत, घरोघरी वृत्तपत्र टाकणारे, घरेलू कामगार, नाका कामगार, कुरिअर पोहचविणारे डिलिव्हरी बॉय आदी दैनंदिन उपजिविका करणाऱ्या असंघटीत कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचारी वर्गालाही राज्य सरकारने दिलासा द्यावा व ३१ मार्च पर्यंत या वर्गाला दर दिवशी काही ठराविक रक्कम जाहिर करावी अथवा त्यांच्यासाठी सरकारी योजनेतून रेशन उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी दरेकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.