संचारबंदी : नाशिकमध्ये पेट्रोल पंपांवर निर्बंध!

    दिनांक  23-Mar-2020 19:42:57
|

petrol pump_1  


प्रत्येकी मिळणार फक्त एवढंच इंधन...

नाशिक : देशभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोना व्हायरसाच हा संसर्ग रोखण्यासाठी देशातली बरीच राज्य लॉकडाऊन करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातही ३१ मार्चपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सुविधा बंद करण्यात आल्या आहेत.


नाशिकमध्ये पेट्रोल पंपांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. नाशिक शहरात एकदा एकावेळी फक्त १०० रुपयांचं पेट्रोल नागरिकांना उपलब्ध होणार आहे. तसेच चार चाकी वाहनांना केवळ १ हजार रुपयांचे इंधन मिळणार आहे. तर, पेट्रोल पंप सकाळी ७ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच उघडे ठेवण्यात येणार आहेत.


दुसरीकडे नाशिकमध्ये असलेला नोट छापण्याचा कारखानाही ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय रविवारी घेण्यात आला. ३१ मार्चपर्यंतच्या नोटांची छपाई झाल्यामुळे कारखाना बंद ठेवण्यात येणार आहे.


कोरोनाचा धोका टाळण्यासाठी देशभरातली रेल्वेसेवाही ३१ मार्चपर्यंत बंद असेल. तसेच राज्य सरकारने एसटी बसही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन केंद्र आणि राज्य सरकारकडून वारंवार केले जात आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.