बुधवारपासून देशांतर्गत विमानसेवा खंडीत!

23 Mar 2020 18:37:56

airlines_1  H x



कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय



मुंबई : कोरोना विषाणूच्या वाढत्या पार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकाने देशांतर्गत विमान उड्डाणावर बंदी घातली आहे. विमान कंपन्यांनी आपल्या सर्व देशांतर्गत उड्डाणातील प्रवाशांना मंगळवारी मध्यरात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत त्यांच्या गंतव्य स्थानापर्यंत सोडावे लागणार आहे. देशांतर्गत विमान उड्डाणास बंदी असली तरी मालवाहतूक विमानसेवा सुरुच राहिल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.


कोरोना विषाणूचा पार्दुभाव होऊ नये म्हणून केंद्र व विविध राज्यातील राज्य सरकारकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. सरकारने विविध राज्यात लॉकडाऊनही केले आहे. परंतु, काही नागरिक रस्त्यावर येऊन गर्दी करत असल्यामुळे सरकारच्या प्रयत्नांना म्हणावे तसे यश येताना दिसत नाही. सरकारने यापूर्वीच आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केली आहे. त्याचा पुढचा भाग म्हणून आता देशांतर्गत विमान उड्डाणही बंद करण्यात आले आहे.


कोरोना विषाणूग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशात हा आकडा ४१५ वर गेला असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने सोमवारी सांगितले. पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्रित येऊ नये यासाठी जमावबंदीचा यापूर्वीच आदेश काढण्यात आला आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहेत.
Powered By Sangraha 9.0