औरंगाबादच्या प्राध्यापक महिलेने कोरोनावर केली मात ; डॉक्टरांचे मानले आभार

23 Mar 2020 18:54:41

aurangabad_1  H
औरंगाबाद : औरंगाबादमधील ५९ वर्षीय महिलेले १५ मार्च रोजी कोरोनाची लागण झाल्याने समजले. त्यानंतर तिच्यावर औरंगाबाद शहरातील रुग्णालयात उपचार करण्यात आले. आता ही महिला कोरोना मुक्त झाल्याचे घोषित करण्यात आल्या असून त्यांना सोमवारी रुग्णालयातून सोडण्यात आले. त्यानंतर महिले त्या डॉक्टरांचे आभारही मानले. त्यामुळे योग्य ती काळजी घेतल्यास कोरोना विषाणूपासून सुटका होऊ शकते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
 
 
 
संबधित ५९ वर्षीय महिला रशिया आणि कझाकिस्तान मध्ये गेली होती. भारतात परतल्यानंतर तिच्यात कोरोनाची लक्षणे दिसून आली होती. यानंतर तिच्यावर शहरातील एका खासगी रुग्णलयात उपचार सुरू होते. दरम्यान २१ मार्च रोजी महिलेचे नव्याने पाठवलेल्या स्वॅबचा अहवाल हा नकारात्मक आला. त्यांतर तिला घरी सोडण्यात आले. तसेच, या महिलेच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचे देखील अहवाल मागवण्यात आले. त्यांचे अहवालसुद्धा समाधानकारक आले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0