महाराष्ट्रात संचारबंदी लागू : मुख्यमंत्री

23 Mar 2020 17:30:39
Uddhav Thackery_1 &n
 
 
 
 
मुंबई : राज्यातील कोरोना विषाणूचा वाढता फैलाव लक्षात घेता राज्यात संपूर्णपणे संचारबंदी लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. त्यामुळे येत्या काळात गरज नसताना नागरिकांना बाहेर पडता येणार नाही. रिक्षामध्ये एकाच व्यक्तीला प्रवास करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवा अखंड सुरू राहतील मात्र, जनतेच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला असून आपल्या देशाची सेवा म्हणून हा नियम पाळावा, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.
अद्याप राज्यातील जनतेला या आजाराचे गांभीर्य समजलेले नाही. त्यामुळे नाईलाजाने हा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत राज्याच्या सीमा बंद करण्यात येतील, तसेच जिल्हाअंतर्गत संचारबंदीही लागू केली जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
विमानसेवा बंद करा
देशातील अंतर्गत विमानसेवा बंद करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. याबद्दलही लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.
 
Powered By Sangraha 9.0