शाहीनबागेत पेट्रोल बॉम्ब : लक्ष वेधण्यासाठी किळसवाणा प्रकार

22 Mar 2020 13:47:12

Shahin Baug_1  

कोरोनापासून बचावासाठी मास्क, सॅनिटायझरची मागणी


नवी दिल्ली : देशभरातून जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असताना शाहीनबागेत मात्र, अद्याप धरणे आंदोलन सुरूच आहे. आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा पवित्रा निदर्शनकर्त्यांनी घेतला आहे. रविवारी पहाटे या ठिकाणी पेट्रोल बॉम्ब फेकल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. दिल्ली हिंसाचारावेळीही याच प्रकारचे पेट्रोल बॉम्ब वापरण्यात आले होते. त्यामुळे हा हल्ला नेमका कुणी केला, असा प्रश्न आहे. तर दुसरीकडे जनता कर्फ्यूच्या वातावरणात आंदोलकांनी लक्ष वेधून घेण्यासाठी हा प्रकार तर केला जात नाही ना, असाही संशय व्यक्त केला जात आहे. हा सर्व प्रकार कुणी केला याबद्दल अद्याप सविस्तर वृत्त समजू शकलेले नाही.
 
 
 
कोरोना विषाणूचा फैलाव अत्यंत वेगात होत असता दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन केले असतानाही धरणे आंदोलन सुरू आहे. सोशल मीडियाद्वारे नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न शाहीनबागेतील आंदोलकांकडून सुरू आहे. शनिवारी शाहीनबागेतील आंदोलकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले कि, आम्ही कोरोना संदर्भातील सर्व निर्देश पाळत आहोत. एका तंबूत केवळ दोनच व्यक्ती आंदोलन करत आहेत. इथे पाच वेळा नमाज पठण केले जाते, स्वच्छताही पाळली जात आहे. काहीही झाले तरी हे आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमीका त्यांनी घेतली आहे.
Powered By Sangraha 9.0