संपूर्ण देशातून कोरोनाशी लढणाऱ्या त्या सर्वांना अभिवादन

    दिनांक  22-Mar-2020 17:11:02
|

thali_1  H x W:
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनाला संपूर्ण देशवासीयांनी प्रतिसाद दिला आहे. आज लागू झालेल्या जनता संचारबंदीनंतर सायंकाळी ५ वाजता सर्व नागरिकांनी आपल्या सुक्षिततेसाठी लढणाऱ्या सर्व डॉक्टर, पोलीस यंत्रणा तसेच स्वच्छता कर्मचारी यांना अभिवादन करण्यासाठी टाळी तसेच थाळीनाद करावा असे आवाहन केले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही आपल्या कुटुंबासमवेत बाल्कनीत येत टाळ्या वाजवत या आवाहनाला प्रतिसाद दिला.
 
 
तसेच यामागील काही शास्त्रीय कारणे देखील यानिमित्ताने समोर आली होती. कोरोनाने संपूर्ण जगभरात थैमान घातले असून भारतात देखील कोरोना रुग्णाची संख्या वाढते आहे. याच पार्श्वभूमीवर पुढील काही दिवस कलम १४४लागू केले आहे. तसेच नागरिकांनी देखील खबरदारी म्हणून घरातून बाहेर ना निघण्याचे आवाहन केले आहे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.